vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता…

मुंबई, प्रतिनिधी दि: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरूनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.विशेष प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले, आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे. याच शाळेतील शिक्षण आणि संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. माझ्या वक्तृत्वाची सुरुवातीची पावलं याच व्यासपीठावर पडली असल्याची आठवण सांगत, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलो, असेही नमूद केले. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील वर्गखोल्या, वाचनालय, चित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शालेय जीवनात त्यांच्या सोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली.

संबंधित पोस्ट

युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन*दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव; विविध कंपन्या व उद्योगांमध्ये करिअरच्या व्यापक संधी*राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये चमकलेल्या मोनिका सानू मडावीचा गौरव; गडचिरोलीत सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारणीला शासनाची मंजुरी*

vishwatmaklokswamivarta

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ जल,स्वच्छ मन’ मोहीमेंतर्गत नवी मुंबईत जलाशय व परिसर स्वच्छतेच्या ठिकठिकाणी विशेष मोहीमा

vishwatmaklokswamivarta

स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस-राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या ‘विवेक कार्यशाळेचे उद्घाटन’यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta