vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

 

राज्य प्रतिनिधी-राज्यात सध्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषा वादाचा मुद्दा चर्चेत आहे. असं असतानाच कल्याणमध्ये एक खळबळनजक घटना घडली आहे. कल्याणमधील परप्रांतीय तरुणाने दादागिरी करत मराठी तरुणीला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या तरुणाविरोधात मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणी ही खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम पाहते. 21 जुलै रोजी रुग्णालयात गोपाल झा नावाचा परप्रांतीय तरुण आला. तेव्हा त्यांने डॉक्टरांची भेट घ्यायची असल्याचे सांगितले. तेव्हा पीडित तरुणीने डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा, असं सांगितले. या क्षुल्लक गोष्टीवरुन परप्रांतीय तरुणाने तिला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

पाडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुले रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुण रुग्णालयात आला. पण डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये म्हणजेच डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये MR बसले असताना कोणालाही आतमध्ये पाठवू नये, असा नियम आहे. याच नियमाते पालन करत असताना नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला. तेव्हा त्याला थांबा जाऊ नका, असं म्हटलं.

पीडित तरुणीने नशेखोर तरुणाला अडवल्यानंतर त्याने सरळ धावत येऊन तरुणीच्या तोंडावर लाथ मारुन खाली पडलं. व तिचे कपडे फाडून लाखा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंदवली असून नशेखोर तरुण पीडित तरुणीच्या अवतीभवती फिरत असल्याचे तिने म्हटलं आहे. अशी बातमी ही विविध वेबसाईटवर दिसून येत आहे

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

धारावीत भारतीय जनता पार्टी चे लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta