vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छ जल,स्वच्छ मन’ मोहीमेंतर्गत नवी मुंबईत जलाशय व परिसर स्वच्छतेच्या ठिकठिकाणी विशेष मोहीमा

‘स्वच्छ जल,स्वच्छ मन’ मोहीमेंतर्गत नवी मुंबईत जलाशय व परिसर स्वच्छतेच्या ठिकठिकाणी विशेष मोहीमा

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वांगीण स्वच्छतेवर भर देण्यात येत असून विविध मोहीमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ विशेष मोहीम महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी राबविण्यात आली.

घणसोली विभागातील राजीव गांधी तलावाप्रमाणेच खैरणे सेक्टर 12 येथील तलाव व त्याच्या परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी वने मंत्री ना.श्री. गणेश नाईक यांची विशेष उपस्थिती होती. कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.वसंत मुंडावरे व स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंग चव्हाण तसेच स्वच्छता निरीक्षक व पर्यवेक्षक आणि स्वच्छताकर्मींनी या मोहीमेत सक्रीय सहभाग घेतला. श्री संत निरंकारी मंडळ यांचे संयोजक श्री.मनोहर सावंत व संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी स्वच्छ जल स्वच्छ मन या मोहीमेत सक्रीय सहभागी होत मोहीम यशस्वी केली.

 अशाच प्रकारची मोहीम बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात सहाय्यक आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी डॉ.अमेाल पालवे आणि स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर यांनी सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्वच्छताकर्मींना सोबत घेऊन राबविली. या ठिकाणीही श्री संत निरंकारी मंडळ, बेलापूर नेरुळ ‍शिरवणे यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.

  वाशी सेक्टर 10 येथील मिनी सीशोअर परिसरात विभाग अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त श्रीम.अलका महापूरकर व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या माध्यमातून जलाशय व परिसर स्वच्छता करण्यात आली. यामध्ये वाशी विभागातील अधिकारी , कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्यासह श्री संत निरंकारी मंडळांचे सदस्यही मोठया संख्येने सहभागी झाले होते.इतरही विभागात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, परिमंडळ उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व डॉ.कैलास गायकवाड तसेच घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्री.संतोष वारूळे यांच्या नियंत्रणाखाली तेथील सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ मोहीमा लोकसहभागातून राबविण्यात आल्या

00000

संबंधित पोस्ट

मुंबई क्लायमेट वीक’च्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा…

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta