vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वाचन, विज्ञान, कवितांच्या मैफलीने ग्रंथोत्सवात रंगत-दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव 2024 ची सांगता

वाचन, विज्ञान, कवितांच्या मैफलीने ग्रंथोत्सवात रंगत-दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव 2024 ची सांगता

 

सांगली, प्रतिनिधी : सांगली ग्रंथोत्सव 2024 च्या दुसऱ्या व अंतिम दिवशी वाचन, विज्ञान व संविधानाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांनी रंगत आणली.

 पहिल्या सत्रात चला संकल्प करूया वाचनाचा या विषयावर ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली महाचर्चा घेण्यात आली. यामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, निवृत्त ग्रंथपाल आप्पासाहेब मासुले, श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या ग्रंथपाल संध्या यादव आणि सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदय हे वक्ते महाचर्चेत सहभागी झाले होते.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात हसत खेळत विज्ञान या विषयावर विज्ञान लेखक व प्रसारक जगदीश काबरे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात बदलती जीवनशैली टिपणाऱ्या कवितांची मैफल प्रसिद्ध कवी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली रंगली. यामध्ये सादर करण्यात आलेल्या कवितांना उपस्थितांनी दाद दिली.

 चौथ्या सत्रात भारतीय संविधान आपले भविष्य या विषयावर प्रा. निरंजन व्याख्याते यांचे व्याख्यान झाले. समारोप सत्रात वाचक व विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गौतमीपुत्र कांबळे प्रमुख अतिथी होते. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. संवादक म्हणून विठ्ठल मोहिते यांनी भूमिका पार पाडली.

 यावेळी ग्रंथालय कार्यालयाचे अधिकारी, जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कच्छी जैन भवन येथे आयोजित या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या यशस्वी संयोजनासाठी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांच्यासह ग्रंथालय कार्यालयातील कर्मचारी, जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांनी मेहनत घेतली.

 सांगली ग्रंथोत्सव 2024 निमित्त पुस्तक प्रदर्शनास वाचकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.

00000

संबंधित पोस्ट

भूसंपदा क्षेत्रीय गटाचे सर्वेक्ष न नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात-रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील