vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

      रायगड, प्रतिनिधी- जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) -2 अंतर्गत 21 जून 2025 रोजीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली.

 याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 हा आंतरराष्ट्रीय योग दिनास येत्या 21 जून 2025 रोजी एक दशक पूर्ण करत आहे. या निमित्ताने देशात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम 10 विशेष कार्यक्रमांमध्ये विभागलेले आहेत.या अनुषंगाने कार्यक्रम क्रमांक 1 – योग संगम मध्ये योग संगम किंवा मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम दि.21 जून 2025 रोजी सकाळी 6:30 ते 7:45 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मा.पंतप्रधान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथून राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे होणार आहे.

   योग संगम हे व्यापक जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या किंवा परिसरातील आयुषमान आरोग्य मंदिर यांच्या सहकार्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.यासाठी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी क्यूआर कोड 1 स्कॅन करून योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ सामग्री क्यूआर कोड 2 स्कॅन करून मिळवता येईल.

कार्यक्रम क्रमांक 2- हरित योग मध्ये हरित योग उपक्रम पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरणीय शाश्वततेला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे.यावर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमांतर्गत योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे.ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या या उपक्रमांना हरित योग अंतर्गत योग दिनाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे राबविता येणार आहे.योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ साहित्य क्यूआर कोड 3 स्कॅन करून प्राप्त करता येणार आहे.

 यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वॉश केंद्रित (पाणी, स्वच्छता व आरोग्य) दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून योग, आरोग्य व वॉश यांच्यातील संबंध अधोरेखित करता येईल. सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी “योग फॉर वेल बिइंग अँड वॉश ” या संमेलनाचे आयोजन अशा ठिकाणी करावे जिथे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )-2 अंतर्गत मालमत्ता उपलब्ध आहेत.सर्व कार्यक्रम हरित योग किंवा योग संगम या मुख्य कार्यक्रमाशी सुसंगत असावेत.

   तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व इतर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे, कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे, महत्त्वाच्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे , समुदाय, योग क्रिया व योजनांची मालमत्ता दर्शविणाऱ्या स्पष्ट छायाचित्रांची नोंद केली जाणार आहे.

   दरम्यान या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन व कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत तसेच कार्यक्रमांची सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन प्रकल्प संचालक (जजीमि) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) शुभांगी नाखले यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

समाजभान असलेला पत्रकार -दीपक एस मठपती….

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर**गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी – पालकमंत्री शंभूराज देसाई*

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत..