vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध…

ठाणे, प्रतिनिधी- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयाने ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणी, जादा प्रवासी वाहून नेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसी उध्दट वर्तन करणे, शिवागाळ करणे इ. गुन्ह्यांकरिता ऑटोरिक्षा प्रवाशांसाठी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी मोबाईल क्र. 9423448824 (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ऑटोरिक्षा चालकाने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केल्यास प्रवाशाने ठिकाण, दिनांक, वेळ व गुन्ह्याचे स्वरुप, फोटो इ. तपशिलासह वरीलप्रमाणे नमूद व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार दाखल करावी. या तक्रारीची दखल घेवून ऑटोरिक्षा चालकावर मोटार वाहन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.00000

संबंधित पोस्ट

शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ उपक्रमात मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta

तालुका व गावपातळीवर आढावा घेऊन मान्सुन पूर्व तयारीचे आराखडे 20 मे पूर्वी सादर करावेत**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा !

vishwatmaklokswamivarta

मुंबईला बॉम्बने उडून देण्याची बॉम्ब हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

vishwatmaklokswamivarta