vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात-रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात-रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध

राज्य प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला मंगळवार १४ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील २६६ शाळांचा समावेश असून चार हजार ५७८ जागा उपलब्ध आहेत. १४ ते २७ जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी केले आहे.

विशेष म्हणजे खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी, चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी या बाबींचा विचार करुनच अर्ज भरणे गरजेचे आहे. याकडेही पुनीता गुरव यांनी लक्ष वेधले.

आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यातील २६६ शाळांचा समावेश असून चार हजार ५७८ जागा उपलब्ध आहेत. राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासारखे कागदपत्र आरटीई प्रवेशासाठी महत्वाचे आहेत. पालकांनी ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरावी अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत.

………………..

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा,विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मावोवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, 6200 कोटींची गुंतवणूक, 9000 रोजगार कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे शेअर्स प्रदानगडचिरोलीपासून 200 कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद सी-60 जवानांचाही सत्कारपोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण