vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

‘दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

 

रायगड प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय कार्यालय परिसरात ‘दिव्यांग आनंद मेळा’ मंगळवार (दि.२५) पासून आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. या ‘दिव्यांग आनंद मेळा’चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ८० दिव्यांग बा़धवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग बांधवांना आपल्याला असलेल्या दिव्यांगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे कुबड्या, कॅलिपर, श्रवणयंत्र, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, जयपूर पाय हे साहित्य ‘दिव्यांग आनंद मेळा’ आयोजित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग आनंद मेळा’ उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शासकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, मोहन साळुंखे, डॉ. मिनल जाधव, साईनाथ पवार उपस्थित होते.

.

संबंधित पोस्ट

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडणार;बालकांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतातील प्रवास सेवा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टची सुविधा सुरू

vishwatmaklokswamivarta

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन