vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

*’माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

राज्य प्रतिनिधी-

    *महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका 10 लक्षपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात राज्यस्तरावर ‘द्वितीय’ क्रमांकाची मानकरी’ ठरलेली आहे.*

          *आज मुंबईमध्ये झालेल्या माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यामध्ये नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी हा मानाचा पुरस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री ना.श्रीम.पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते, विभागाच्या सचिव श्रीम.जयश्री भोज यांच्या प्रमुख उपस्थितीत स्विकारला.* यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे, श्री.प्रवीण गाडे, श्री.राजेश पवार, श्री.यशवंत कापसे, श्री.दिपक सूर्यराव आणि अभियंता श्री.स्वप्निल देसाई उपस्थित होते.

          *याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेस ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ आणि ‘अभियान 5.0’ असे मागील दोन्ही वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन्ही वर्षांत नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. याशिवाय ‘अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी थीमॅटीक’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यस्तरीय सर्वोत्तम कामगिरीचे विशेष पारितोषिकही प्रदान करण्यात आले. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेस एकूण 3 पुरस्कार लाभले*.

          *नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील* यांनी हे पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांच्या पर्यावरण कार्यातील सक्रिय सहभागाला समर्पित केला असून पर्यावरण विषयक विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था – मंडळे त्याचप्रमाणे उद्यान, अभियांत्रिकी, स्वच्छता व विविध विभागांतील कर्मचारी आणि प्रसारमाध्यमे यांच्या एकत्रित सहभागामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. या यशाबद्दल त्यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

          *उपमहापौर श्री.दशरथ भगत* यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करतानाच या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याचे सांगत यामुळे मिळणारी प्रेरणा पुढील पर्यावरणपूरक वाटचालीसाठी प्रोत्साहक ठरेल असे म्हटले आहे. आगामी काळात आणखी चांगले काम केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

          *महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे* यांनी हा राज्यस्तरीय सन्मान लोकप्रतिनिधी, प्रशासन, विविध संस्था – मंडळे व नागरिक यांच्या सामुहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगत यापुढील काळात मॉनिटरिंग व डेटा-इंटिग्रेशन सबलीकरणावर आणि हरित आच्छादन व जलस्रोत संवर्धनाचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येईल तसेच हवा गुणवत्ता सुधारणेवर भर दिला जाईल असे सांगितले आहे.

   पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने यामधील प्रत्येक तत्वाशी निगडीत थिमॅटिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गतवर्षी अभियान 4.0 मध्ये भूमी थिमॅटिक क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार यावर्षी समारंभात प्रदान करण्यात आला.

          नवी मुंबई महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानात केलेल्या विविध क्षेत्रातील महत्वाच्या बाबींचा विचार यावेळी करण्यात आला त्यामुळे 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी नवी मुंबई राज्यात व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली.     यामध्ये –

*1. हरित आच्छादन व जैवविविधता* — • स्थानिक प्रजातींची व्यापक वृक्षलागवड, • जिओटॅगिंगसह वृक्षगणना आणि वृक्ष संवर्धन योजना राबवून शहरात हरित पट्ट्यांचा विस्तार केला गेला. • लोकजैवविविधता नोंदवही (PBR) तयार करून शास्त्रीय दस्तऐवजीकरण केले गेले.• बीज संकलन केंद्र व स्थानिक प्रजातींचे संवर्धन यामुळे जैवविविधतेला चालना मिळाली. • माती-संवर्धनासाठी बांबू, खस/वेटिव्हर व शेवगा यांसारख्या वनस्पतींची लागवड.• सार्वजनिक व घरगुती कंपोस्टिंग केंद्रांद्वारे मातीतील कार्बन शोषण वाढविण्यावर भर देण्यात आला.

*2. घनकचरा व्यवस्थापन* — • कचऱ्याचे स्त्रोतस्थळी विभाजन, • ओल्या कचऱ्याचे स्थानिक प्रक्रियाकरण (कंपोस्टिंग), • सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व वैज्ञानिक विल्हेवाट, • बायोमेडिकल व ई-कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन राबविण्यात आले. • सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी कठोर अंमलबजावणी आणि पुनर्वापर-आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे कचऱ्याचे प्रमाण आणि त्याचा पर्यावरणीय प्रभाव दोन्ही कमी झाले.

*3. वायू गुणवत्ता व प्रदूषण नियंत्रण* — • नियमित वायु गुणवत्ता परीक्षणातून मिळालेल्या डेटावर आधारित लक्ष्यित धोरणे राबविली गेली. • EV धोरणाची अंमलबजावणी. त्यामध्ये सार्वजनिक व खासगी चार्जिंग स्टेशनची उभारणी.• सायकलिंग ट्रॅक व पादचारी मार्गांचा विकास• फटाके बंदीसाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबविल्यामुळे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी पाऊले उचलले गेले.*4. जलसंपत्ती व जल व्यवस्थापन* — • सार्वजनिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग, • पाझर तलाव व परकोलेशन pits, • भूजल पुनर्भरणासाठी विहिरींचा वापर.• जल लेखापरीक्षणाद्वारे Non-Revenue Water कमी करण्याचे उपाय राबविले गेले. • मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प व उपचारित पाण्याचा पुनर्वापर यामुळे पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित झाला.

*5. ऊर्जा कार्यक्षमता व अक्षय ऊर्जा* — • सार्वजनिक इमारतींमध्ये ऊर्जा लेखापरीक्षण. • हरित पथदिवे, कुल रूफिंग आणि स्थानिक सौर प्रकल्पांच्या माध्यमातून ऊर्जा बचत व कार्बन कमी करण्यावर भर. निव्वळ शून्य  कार्बन उत्सर्जनाच्या संकल्पनेबाबत जनजागृती आणि धोरणात्मक आराखडा राबविण्यात आला.*6. जनसहभाग, शिक्षण व समुदाय सहभाग* —  ई-प्लेज, सोशल मीडिया मोहिमा.• शाळा व महाविद्यालयांमध्ये पर्यावरण सेवा योजना आणि MYCA सारख्या उपक्रमांतर्गत तरुण सक्षमीकरण.• SHG, CSR व स्वयंसेवी संस्थांमार्फत समुदाय-आधारित उपक्रम आणि पर्यायी निधी उभारणी यामुळे उपक्रमांना व्यापक सामाजिक आधार मिळाला.

  – अशा सर्व क्षेत्रांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी महाराष्ट्र राज्यातील 10 लाख लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. या दोन्ही वर्षातील पुरस्कार या समारंभात प्रदान करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

कुंडल वन प्रबोधिनीमध्ये विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं.

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी..

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta