vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, प्रतिनिधी : वनालगतच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना प्रति एकर वार्षिक 50 हजार रुपये देऊन शासनाने त्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सोलार कुंपण घालावे, अशी योजना शासनाच्या विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सदाशिव खोत यांनी लातूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.वनमंत्री श्री.नाईक म्हणाले, राज्यात वन्यजीवांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचा त्रास होत आहे, ही बाब खरी आहे. वनक्षेत्रालगत सोलार कुंपणासाठी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोलार बनवणाऱ्या कंपन्यांसोबत महाराष्ट्र वन विकास महामंडळामार्फत करार करण्यात येईल. येथे केवळ सोलारच्या माध्यमातून वीज निर्मितीच नव्हे तर वन्य प्राणी खाणार नाहीत आणि आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार होईल असे पाम रोजा नावाचे गवत विकसित करण्याची योजना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वनालगत बफर झोन आणि लगतच्या शेतकऱ्यांसाठी सोलार कुंपण घालण्याची चांगली योजना आणत असल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे यावेळी अभिनंदन केले. यामाध्यमातून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमधून नागरिकांचे जीव वाचवण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

रंगानुभूति’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होतेय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा; मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

कारगिल विजय दिवसाच्या 26 व्या स्मरण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संजय सेठ यांच्या उपस्थितीत ‘कारगिल विजय दिवस पदयात्रेचे आयोजन

शाळेचा पहिला दिवस उत्साहात…! सिनगाव जहाँगीर येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा; शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta