vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्येकोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही- उद्योग मंत्री उदय सामंत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्येकोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.सदस्य शंकर जगताप यांनी या संदर्भातला लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महेश लांडगे यांनीही सहभाग घेतला.

उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले, नगर नियोजनामधील आरक्षण प्रक्रियेसाठी एमआरटीपी कायद्यानुसार कार्यवाही केली जाते. त्यानंतर यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांचा गांभीर्याने विचार केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामधील प्रस्तावित आरक्षणांबाबत कोणत्याही व्यक्तीला शंका असल्यास, त्यांनी लेखी तक्रार अथवा निवेदन सादर केल्यास त्याची चौकशी केली जाईल. तसेच धार्मिक स्थळांवर आरक्षण आल्यास त्याचीही तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

००००

 

संबंधित पोस्ट

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली तर नातेवाईकांना रु. ५ लाख अर्थसहाय्याची घोषणा

राज्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

जालना शहर महापालिका श्री गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आयुक्त यांचे हस्ते स्थापना.