vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

 

छत्रपती प्रतिनिधी- यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषीत केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात येत्या मार्च महिन्या अखेर ज्या ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात सहकारी संस्था कार्यान्वित नाही तेथे संस्था कार्यान्वित करण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ हे अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 

            राज्य प्रतिनिधी- जिल्हा सहकार विकास समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, क्षेत्रिय व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन शा. ना. साळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी मनिषा हराळ मोरे, जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश महाडीया, सहा. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमोल शेळके, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अजय मोटे, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध के.एम. शहा, सह निबंधक डॉ. ए.बी. काशीकर तसेच अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ६९२ सहकारी संस्था असून त्यात ३०५ संस्थाचे संगणकीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या सर्व संस्थांना संगणक व सहसाहित्य पुरवठा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे १३३ सार्वजनिक सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. संस्थाच्या गटसचिवांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्ह्यात सहकारी संस्थांमध्ये २ जनऔषधी केंद्र, ४ धान्य साठवण केंद्र इ. कार्यान्वित करण्यात आले आहेत.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सहकारी संस्था कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु करावी. ३१ मार्च पर्यंत ही प्रक्रिया आटोपली पाहिजे. ज्या ग्रामपंचायतीत संस्था नाहीत अशा ग्रामपंचायतींची यादी करुन प्रक्रिया सुरु करावी. त्याशिवाय जिल्ह्यात दुग्धोत्पादन, दुधावरील प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात सहकारी संस्थांना चालना द्यावी. त्याच प्रमाणे पोल्ट्री, डेअरी या क्षेत्रालाही चालना देऊन त्यात सहकारी संस्थांचा सहभाग वाढवावा.संस्थांच्या बळकटीकरणासाठी उपक्रम राबवावे. याद्वारे ग्रामिण भागात रोजगार निर्मिती उपक्रमांना चालना द्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.

 बैठकीत सहकार विभागांतर्गत येणाऱ्या केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात नवीन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या स्थापन करणे, विविध कार्यकारी सेवा संस्थांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करणे. डेअरी, मत्स्य व्यवसाय, जनऔषधी केंद्र, धान्य गोदामे, खते-बि-बियाणे, पेट्रोल पंप इ. गोदाम बांधकामांसाठी प्रस्ताव तयार करणे, आपले सेवा केंद्र सारखे सेवा केंद्र सुरु करणे. धान्य खरेदी केंद्र सुरु करता यावे यासाठी विविध तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अशा विविध विषयांबाबत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात सहकारी संस्थांमार्फत करता येण्यासारख्या मत्स्य व्यवसाय, दूध संकलन केंद्र, दाळ प्रक्रिया व्यवसाय अशा विविध व्यवसायांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. तसेच सहकारी संस्थांचे संगणकीकरण करुन त्यांचे अद्यावतीकरण करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

 

०००००

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व महत्त्वाची देवस्थाने शक्तीपीठाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. नागपूर ते गोवा असा हा शक्तीपीठाचा मार्ग असेल. लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक

उद्या मंगळवार एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता….

भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण !

vishwatmaklokswamivarta

चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*