vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एंगेज्ड २’ या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन-महिलांचा सन्मान करता येत नसेल, तर अवमान तरी करू नका ! हिंदु जनजागृती समिती**हात न लावता महिलेचा काढला टी-शर्ट, सर्वांसमोर घातली आंघोळ; एल्विश यादवचा तो कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात…*

एंगेज्ड २’ या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन-महिलांचा सन्मान करता येत नसेल, तर अवमान तरी करू नका ! हिंदु जनजागृती समिती**हात न लावता महिलेचा काढला टी-शर्ट, सर्वांसमोर घातली आंघोळ; एल्विश यादवचा तो कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात…*

राज्य प्रतिनिधी- *मुंबई:* ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘एंगेज्ड २’ (Engaged 2: Roka Ya Dhoka) या ‘रिॲलिटी शो’मधून होणाऱ्या अश्लीलतेच्या विरोधात आणि महिलांच्या विटंबनेविरोधात हिंदु जनजागृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात समितीने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देऊन या ‘रिॲलिटी शो’वर तात्काळ बंदी घालण्याची आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असतांना, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे करण्यात येत असलेले अश्लील सादरीकरण लाजिरवाणे असून, यातून महिलांवरील अत्याचारांना प्रोत्साहनच मिळेल. त्यामुळे महिलांचा सन्मान राखता येत नसेल, तर अवमान तरी करू नका, असे ‘रिॲलिटी शो’च्या आयोजकांना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी कु. प्रियांका लोणे यांनी सुनावले आहे. समितीने केलेल्या या मागणीची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश देण्यात येतील, तसेच या संदर्भात कारवाई करण्यासाठी सांस्कृतिक विभागालाही कळवले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

    या ‘रिॲलिटी शो’मध्ये ‘लॅप डान्स’, ‘मड टास्क’ आणि ‘आइस क्यूब टास्क’ यांसारख्या अत्यंत हीन दर्जाच्या कृत्यांद्वारे महिलांचे वस्तूकरण केले जात असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः हाताचा वापर न करता केवळ तोंडाने महिलांचे वस्त्र काढण्यासारखे, सार्वजनिकरित्या महिलांना हाताने स्पर्श करून आंघोळ घालणे, अंगाला चिखल लावणे आदी टास्क हे कायद्याचे उघड उल्लंघन करणारे आहेत. या कृत्यांमुळे यु‍वापिढीवर विपरीत परिणाम होत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेला हा स्वैराचार रोखणे काळाची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.    या विषयाचे गांभीर्य ओळखून भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून अशा अश्लील साहित्यावर कायमस्वरूपी निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

   डिजिटल माध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने ‘सांस्कृतिक देखरेख समिती’ गठीत करावी, अशी आग्रही मागणीही या निमित्ताने करण्यात आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि स्त्री-सन्मानाची परंपरा जपण्यासाठी अशा विकृत कार्यक्रमांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. २४ तासांच्या आत ठोस कारवाई करावी, अशी मागणी ही समितीने गृहराज्य मंत्र्यांकडे केली.*कु. प्रियांका लोणे,*समन्‍वयक, हिंदू जनजागृती समिती, उत्तर महाराष्ट्र.

00000

संबंधित पोस्ट

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा #पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

अनुकंपा उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे वाटप होणार !· जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन· एमपीएससीच्या ५० उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळणार

मातृभाषेतून शिक्षणामुळे शब्दसंग्रह, ज्ञानसंपदेत वाढ- शाहीर पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

vishwatmaklokswamivarta

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta