vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोहद कसाळेची विजयी भरारी; दुहेरी विजेतेपदांसह उपविजेतेपदेही पटकावली

सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोहद कसाळेची विजयी भरारी; दुहेरी विजेतेपदांसह उपविजेतेपदेही पटकावली

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी-

येथील DELSA टेनिस अकादमीचा अवघा १२ वर्षांचा होतकरू खेळाडू दोहद कसाळे याने राष्ट्रीय स्तरावरील सलग तीन स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत विजेतेपदे आणि उपविजेतेपदे पटकावत आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

दि. १७ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आयोजित सीएस-७ क्रमवारी टेनिस स्पर्धा एमएसएलटीए वुडरिज हायस्कूल, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या स्पर्धेत दोहद कसाळे आणि समर्थ वानखेडे या जोडीने दुहेरी गटात शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत अर्नव पाटील व पलाश जैन यांचा ६-१, ६-१ असा पराभव, उपांत्य फेरीत अबीर सुखानी व क्रिश सरोज यांच्यावर ६-४, ६-१ अशी मात आणि अंतिम सामन्यात पृथ्वीराज भिवसने व क्षितिज आडगावकर यांच्यावर ६-०, ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत त्यांनी स्पर्धा गाजवली.

यानंतर दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते ०६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ऑल इंडिया टेनिस असोसिएशन तर्फे एक्सलन्स स्पोर्ट्स क्लब, गुरुग्राम येथे झालेल्या एआयटीए स्पर्धेतही दोहदने आपली चमक कायम ठेवली. १२ वर्षांखालील एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत रेयान सिंगवर ६-०, ६-० असा दणदणीत विजय मिळवत तो उपांत्य फेरीत पोहोचला. तसेच १४ वर्षांखालील दुहेरी गटात दोहद कसाळे व ऋषी मात्रेया या जोडीने विजेतेपद मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत एडन शेख व पृथ्वी झून यांच्यावर ६-१, ४-६, १०-२ असा विजय, उपांत्य फेरीत समन्यु जैन व इव्हान जैन यांच्यावर ६-४, ७-६ (७-३) अशी मात आणि अंतिम फेरीत अत्रेय काशीरामका व रेयांश गांधी यांचा ६-१, ६-१ असा पराभव करत त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर दि. ०९ फेब्रुवारी २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आयोजित सीएस-७ क्रमवारी स्पर्धा एनडीटीए, नाशिक येथे पार पडली. या स्पर्धेत १२ वर्षांखालील एकेरी गटात दोहदने प्रभावी सुरुवात करत पहिल्या फेरीत समर सामंता याचा ६-०, ६-० असा सहज पराभव केला. दुसऱ्या फेरीत कियान पेंडुरकर विरुद्धचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. ६-३, ६-७ (४-७), ७-५ अशा संघर्षपूर्ण लढतीत दोहदने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत अर्थ सानप याच्यावर ६-१, ६-० अशी मात केली. उपांत्य फेरीत प्रबीर पटेलविरुद्ध ४-६, ६-४, ६-४ असा दमदार पुनरागमन करत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अखेरीस स्पर्धेचा उपविजेता ठरला.

याच स्पर्धेत १२ वर्षांखालील दुहेरी गटात दोहद कसाळे व पलाश रुचंदानी या जोडीनेही उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत रिदित नवले व युवान बजाज यांचा ६-३, ६-४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत अर्जित बावसकर व कियान पेंडुरकर यांच्यावर ६-२, २-६, १५-१३ अशा अत्यंत थरारक सुपर टायब्रेकमध्ये विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यानंतर ही जोडी उपविजेती ठरली.

अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर दोन विजेतेपदे आणि दोन उपविजेतेपदे पटकावत दोहद कसाळे याने सातत्य, जिद्द आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले आहे. DELSA टेनिस अकादमीसाठी ही अभिमानाची बाब असून छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडाक्षेत्रात नव्या पिढीची दमदार उपस्थिती असल्याचे आशादायक चित्र आहे.

 

संबंधित पोस्ट

स्टार क्रिकेटर दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जाया भारद्वाज अडकले लग्नबेडित; पाहा लग्नाचे काही खास

रॉयल चॅलेंज प्रीमियर लीग ने टोपली, पाटीदार यांच्या जागी पारनेल आणि विजय कुमार यांची नियुक्ती…

रॉजर बिन्नी ठरले सौरव गांगुली यांचे उत्तराधिकारी, बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जय शाह सचिव

vishwatmaklokswamivarta

जितेंद्र अग्रवाल यांनी पुण्याची एनडीए मॅरेथॉन पूर्ण केली..

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड कप 2023 : न्यूझीलंडचा इंग्लंडवर दणदणीत विजय….

बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी…

vishwatmaklokswamivarta