vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

मुंबई, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ (आयएसएफ) आयोजित वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (अंडर-15 बॉईज व गर्ल्स) चॅम्पियनशिप ४ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान शांग्लूओ, चीन येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यस्तरावरील निवडीसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नेरूळ जिमखाना, नेरूळ, नवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक यांनी दिली आहे.

चीन येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवरील निवड चाचणी २५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी येथे घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागासाठी निवड चाचणी नेरूळ जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांतील १५ वर्षांखालील पात्र मुले व मुली या चाचणीत सहभागी होऊ शकतील. या निवडीतून विभागातील सर्वोत्तम पाच मुले व पाच मुली यांची निवड राज्यस्तरासाठी केली जाईल. यासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० नंतर आणि १ जानेवारी २०१४ पूर्वी झालेला असावा.

तसेच, इंग्रजीतील मूळ जन्म दाखला अनिवार्य असणार आहे. राष्ट्रीय चाचणीवेळी किमान सहा महिन्यांची वैधता असलेला भारतीय पासपोर्ट आवश्यक; विभागीय चाचणीवेळी पासपोर्ट अर्जाचा पुरावा सादर करणे आवश्यक. आधार कार्ड आवश्यक, पहिल्या इयत्तेच्या प्रवेशाची शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदणीची सत्यप्रत आवश्यक, भोजन व्यवस्था खेळाडू किंवा संबंधित शाळेने स्वतः करावी असेही विभागीय उपसंचालक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000०००

संबंधित पोस्ट

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta

नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी व्हायोलिन वादन तसेच 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक प्राप्त…

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर 🏞️🌊 श्रीनगरच्या आयकॉनिक डल लेकवर “खेळो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल” जल्लोषात!