vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रक्षाबंधन निमित्त द चिल्ड्रन एड संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट..

रक्षाबंधन निमित्त द चिल्ड्रन एड संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट..

मुंबई, प्रतिनिधी अनेक दशकांपासून बालकल्याणासाठी समर्पित असलेल्या माटुंगा येथील द चिल्ड्रन एड संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देत पाहणी करून कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेतील मुलांसोबत संवाद साधत त्यांच्या सहवासात रक्षाबंधन साजरी करण्याचा विशेष आनंद लाभला असल्याच्या भावना मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अनेक वर्षापासून कार्यरत असलेली ही संस्था बालकांना शिक्षण, कला, नृत्य आणि विविध उपक्रमाद्वारे प्रगतीची संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच विविध सुविधांसह बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याचे अनुभवायला मिळाले असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुलांना राख्या बांधल्या, मुलांशी संवाद साधला, मुलांनी बनविलेल्या विविध वस्तुंचे कौतुक केले.

माटुंगा येथे असलेल्या द चिल्ड्रन एड संस्थेत मुलांना औपचारिक शिक्षण, तसेच एसएससीनंतरचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच कौशल्य शिक्षण, तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक या संस्थेमध्ये नियमित भेट देतात तसेच विशेष वैद्यकीय सुविधाही मुलांना उपलब्ध करून देण्यात येतात.

००००

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

संबंधित पोस्ट

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन*

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जालना शहरासाठी श्रमदान – एक दिवस- एक तास शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा      – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta