vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025 कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमांतर्गत दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्व मतदारांनी सर्व नियमांचे पालन करून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 मतदानासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, परिचर्या शिक्षण महाविद्यालय सांगली दक्षिणाभिमुखी इमारतीमध्ये एकूण 4 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर एकूण 2 हजार 491 इतक्या मतदारांसाठी पुढीलप्रमाणे मतदान व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.

 मतदान केंद्र क्र. १ – मतदार यादी अनुक्रमांक ००१ ते ६००, मतदान केंद्र क्र. २ – मतदार यादी अनुक्रमांक ६०१ ते १२००, मतदान केंद्र क्र. ३ – मतदार यादी अनुक्रमांक १२०१ ते १८००, मतदान केंद्र क्र. ४- मतदार यादी अनुक्रमांक १८०१ ते २४९१.

 या निवडणूक प्रक्रीयेअंतर्गत, नोंदणीकृत MBBS डॉक्टर हे मतदार आहेत. निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून एकूण ४१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांपैकी ९ उमेदवार निवडून देण्याचे असल्याने प्रत्येक मतदार ९ मते देवून आपला मतदानाचा हक्क बजावेल. या मतदानासाठी मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य ओळखपत्र किंवा लोकसभा विधानसभा नुसार अनिवार्य असणारे ओळखपत्र मतदानासाठी घेवून येण्याचे आहे.

  पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, परिचर्या शिक्षण महाविद्यालय सांगली दक्षिणाभिमुखी इमारत परिसरामध्ये दिनांक ०२ व ०३ एप्रिल रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी परिवेक्षीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे (७५८८८२२५००), तसेच डॉ. तुषार बनसोडे (७७५८०५१९५२) यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 9 हजार 650 प्रकरणे निकाली60 कोटी 42 लाख 83 हजार 637 रुपयाची तडजोड रक्कम वसूल..

vishwatmaklokswamivarta

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामेगतीने पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस