vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

    राज्य प्रतिनिधी – लखनऊ – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत होणार्‍या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण आज ‘गोरक्षपीठ पीठाधीश्वर’ तथा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ महाराज यांना देण्यात आले.  या वेळी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रविंद्रकुमार पटेल आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील मुख्यमंत्री कार्यालयात श्री. योगी आदित्यनाथ महाराज यांची भेट घेतली.   या वेळी प्रथम सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील कार्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. सनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ महाराज म्हणाले की, सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वादही त्यांनी या वेळी दिला.

    या वेळी ‘सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा, तसेच हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री श्री. योगीजी यांना भेट देण्यात आली.

संबंधित पोस्ट

पोश’ कायदा व महिला सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करा; राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रशासनाला निर्देश> • सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याच्या सूचन • १० पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी तातडीने ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करा

रायगड जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता🌡️

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा रविवार पासून तीन दिवसांचा अमरावती जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -आमदार बाबुसिंगजी महाराज

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद