vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई, प्रतिनिधी : शासन, समाज आणि व्यक्ती यांच्यातील सुसंवाद दृढ करण्यासाठी तसेच विचारप्रवृत्त व माहितीपूर्ण लेखन वाचकांसमोर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “आपलं मंत्रालय” या गृहपत्रिकेचा विशेषांक मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

या प्रकाशन सोहळ्यास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.विशेषांकात “भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास”, “शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध” यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत. शासनाच्या कार्याचे संवेदनशील व मानवी रूप वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सकारात्मक संवादाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.

“आपलं मंत्रालय” या उपक्रमातून वाचक, समाज आणि शासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व बळकट होईल, असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

हा विशेषांक https://publuu.com/flip-book/945595/2075357 या लिंकवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार

न्यू एरा हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta