vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेला नवी मुंबईतील शाळा – महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेला नवी मुंबईतील शाळा – महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद

नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेस शालेय क्रीडा स्पर्धांकरिता सन २००९-२०१० पासून स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तेव्हापासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांचे सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

       सन २०२५-२६ या वर्षातील नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेचे आयोजन टिळक ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड सायन्स, नेरुळ येथील सुसज्ज मैदानावर अतिशय उत्साहात संपन्न झाले.     तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळातील १४,१७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात एकूण १५३ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा टिळक ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड सायन्स,नेरूळ येथील शाळेच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपट्टू, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री.संजय नाईक यांच्या शुभहस्ते, टिळक ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉ.अजित कुरुप, प्राचार्या डॉ. हिना समानी, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, नमुंमपा जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री.धनंजय वनमाळी, शैक्षणिक प्रशासक श्री.अनिल नायर व श्री.सुनिल नायर, इतर सर्व शाखांचे प्राचार्य आणि पर्यवेक्षक व निवेदिका श्रीम.टिना यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   या स्पर्धेतील १४ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी साधू वासवानी हायस्कूल, सानपाडा आणि अँकरवाला एज्युकेशन अकॅडमी, वाशी यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात साधू वासवानी शाळेच्या संघाने २५-१९ व २५-२० अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

    दुसरी उपांत्य फेरी नॉर्थ पॉईंट स्कूल,कोपरखैरणे आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात झालेल्या लढतीमध्ये नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे शाळेच्या संघाने २७-२५, २५-२० अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

   या १४ वर्षाआतील वयोगटाच्या मुलांचा अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे आणि साधू वासवानी स्कूल सानपाडा यांच्यात होउुन यामध्ये नॉर्थ पॉईंट स्कूल, कोपरखैरणे शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत २५-२२, २३-२५, २५-२१ असे २:१ अजिंक्यपद पटकावून मुंबई विभाग स्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

      या स्पर्धेमध्ये १४ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीत साधू वासवानी हायस्कूल, सानपाडा आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात साधू वासवानी शाळेच्या संघाने २५-२१ व २५-१८ अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

 दुसरी उपांत्य फेरी नॉर्थ पॉईंट स्कूल,कोपरखैरणे आणि अँकरवाला एज्युकेशन अकॅडमी, वाशी यांच्यात होउुन या लढतीमध्ये नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे शाळेच्या संघाने २५-२०, २५-१६ अशा दोन सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

        या 14 वर्षाआतील वयोगटात मुलींचा अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे आणि साधू वासवानी स्कूल सानपाडा यांच्यात होउुन या सामन्यात नॉर्थ पॉईंट स्कूल, कोपरखैरणे शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत २५-१७, २५-१८ अशा दोन सेटमध्ये जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभाग स्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

      या स्पर्धेतील १७ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी अमृता विद्यालयम, नेरुळ आणि न्यु बॉम्बे सिटी स्कूल, घणसोली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात अमृता विद्यालयम शाळेच्या संघाने २५-२१ व २५-२२ अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.   दुसरी उपांत्य फेरी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, सानपाडा आणि एस.एस.हायस्कूल, नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये एस. एस. हायस्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने २५-२३ , २५-२० अशा दोन सरळ सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

    या वयोगटातील मुलांचा अंतिम सामना एस.एस.हायस्कूल, नेरुळ आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात होउुन या सामन्यात एस. एस. हायस्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत २५-२०,२५-२३ अशा सरळ दोन सेटमध्ये सामना जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभाग स्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  १७ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी अँकरवाला एज्युकेशन अकॅडमी, वाशी आणि नॉर्थ पॉईंट स्कूल, कोपरखैरणे यांच्यात झालेल्या सामन्यात नॉर्थ पॉईंट शाळेच्या संघाने २५-१२,२५-११ अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

        दुसरी उपांत्य फेरी न्यु होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली आणि टिळक ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, नेरुळ यांच्यात झालेल्या लढती मध्ये न्यु होरायझन पब्लिक स्कूल ऐरोली शाळेच्या संघाने २५-२०,२५-१८ अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

या गटातील अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे आणि न्यु होरायझन पब्लिक स्कूल,ऐरोली यांच्यात झालेल्या सामन्यात नॉर्थ पॉईंट शाळेच्या संघाने २५-१० व २५-२१ अशा दोन सेटमध्ये जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

      १९ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोली आणि विद्याभवन हायस्कूल, नेरुळ यांच्यात होउुन या चुरशीच्या सामन्यात सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोलीच्या संघाने २५-२१,२५-२० अशा दोन सेटमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला

सरी उपांत्य फेरी एस. एस. हायस्कूल,नेरुळ आणि नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे यांच्यात होउुन या लढतीमध्ये एस. एस. हायस्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने २५-२१,२५-२२ अशा दोन सेटमध्ये जिंकून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

या मुलांच्या 19 वर्षाआतील वयोगटातील अंतिम सामना सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोली आणि एस.एस.हायस्कूल,नेरुळ यांच्यात होउुन या अंतिम सामन्यात सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोलीच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत २७-२५, १५-२५,२५-२१ अशा २:१ सेटमध्ये सामना जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभाग स्तर स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली.

या स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी नॉर्थ पॉईंट स्कूल, कोपरखैरणे आणि टिळक ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, नेरुळ यांच्यात होउुन या सामन्यात नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे कॉलेजच्या संघाने २५-१७, २५-२० अशा दोन सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

     दुसरी उपांत्य फेरी एस.एस. हायस्कूल, नेरुळ आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात होउुन या लढतीमध्ये अमृता विद्यालयम नेरुळच्या संघाने २५-१७, २५-१८ अशा दोन सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.     या स्पर्धेतील १९ वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल,कोपरखैरणे आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात होउुन या अंतिम सामन्यात नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे शाळेच्या संघाने २५-१५,२५-१६ अशा सरळ दोन सेटमध्ये सामना जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता सिध्द केली.   स्पर्धा आयोजनासाठी टिळक एज्युकेशन सोसायटी नेरुळचे संचालक डॉ.अजित कुरुप व प्राचार्य डॉ.हिना समानी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे मुंबई विभागाचे सचिव श्री.धनंजय वनमाळी आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभलेलाभल

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे स्वतः उत्तम मॅरेथॉन रनर असलेले धावपटू असून महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना सुविधा देण्यासाठी आग्रही आहेत. या नमुंमपा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४,१७ व १९ वर्षाआतील मुला – मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

 

नवी मुंबई प्रतिनिधी

संबंधित पोस्ट

जुलै 2025 अखेरचा रविवार ज्येष्ठांसाठी ठरला आनंदोत्सव वार

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावीतर्फे आरती संग्रहाचे वाटप!

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*