vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर

गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर

 

अमरावती, प्रतिनिधी : मध्यपूर्व आणि गल्फ देशांमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या राज्यातील व विशेषतः जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची नियमावली आणि हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि विविध भारतीय दूतावास या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परदेशात अडकलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आणि स्थानिक नियंत्रण कक्षाशी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल. राज्य आपत्कालीन केंद्र: १०७७ (टोल फ्री), ९१-९३२१५८७१४३, ०२२-२२०२७९९०, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष: ०७२१-२६६२०२५, पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) अमरावती: ७५८८४१०००० हेल्पलाईन जाहिर करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने परदेशात असलेल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यात सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी. भारतीय दूतावासाच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपले लोकेशन आणि सद्यस्थिती कुटुंबीयांना सतत कळवत राहावी. आपले मोबाईल चार्ज ठेवावेत आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. सोशल मीडियावर कोणत्याही अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये. संबंधित देशातील भारतीय दूतावासाकडे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

नक्शा’ पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ ड्रोन सर्वेक्षण होणारØ जमिनींचे ३डी नकाशे, मिळकत पत्रिका तयार होणार जागेची सीमा निश्चित होण्यास मदत..

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरासह-ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू

अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा- विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

vishwatmaklokswamivarta