vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

 

अमरावती, प्रतिनिधी: राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. यातून गावात सुविधा देऊन नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे विकासात्मक कामाबरोबरच यंत्रणांनी महसूल वसुलीवर लक्ष केंद्रित करून यासाठी आवश्यक असलेले नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिले.

महाराजस्व अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा नियोजन भवनात घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, परीविक्षाधिन अधिकारी कौशल्या एम., अपर आयुक्त अजय लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, सह जिल्हानिबंधक अनिल औतकर, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी महेश शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

आयुक्त श्रीमती सिंघल यांनी, शासनाने लक्ष्यांक दिलेली महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नियमित आढावा घेण्यात यावा. यासाठी नियोजन करण्यात यावे. ही वसुली होण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी प्रकरण निहाय आढावा घ्यावा.

भूसंपादनाची प्रक्रिया करताना पुनर्वसनावरही लक्ष देऊन पुनर्वसित गावाचे प्रश्न सोडविण्यात यावे. पुनर्वसित गावात करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी प्रयत्न करावेत. ही कामे सुरू असताना या ठिकाणी भेटी देऊन कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी. ही कामे सुरू असताना पाहणी केल्यास यात काही सुधारणाही सांगण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांना मोबदला देताना त्याचवेळी प्लॉटचे वाटप करण्यात यावे. याठिकाणी नागरी सुविधा एकत्रित पूर्ण करण्यात याव्यात. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी व्हिडिओ आणि फोटो काढण्यात यावे. सिंचन प्रकल्प वेगाने वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासोबत पाणीपट्टी आणि करपट्टी वसुली करावी, अभियानात शिबिर आयोजित करण्याबाबत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. महाराजस्व अभियान राबवतेवेळी सर्व कार्यक्रमांची रील्सद्वारे जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

00000

संबंधित पोस्ट

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

छत्रपती संभाजीनगर पोलिसांना नवीन ३३ वाहनांचा ताफा; गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे बळ पोलीस दल अधिक बळकट करण्यावर भर -पालकमंत्री शिरसाट

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन