vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

नांदेड प्रतिनिधी :- महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळ, पुणेमार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत इयत्ता 5 वी प्राथमिक स्तर व इयत्ता 8 वी उच्च प्राथमिक स्तराच्या मूल्यमापनासाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यासाठी 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत मूल्यमापन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मूल्यमापनाचा निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर 11 जून 2026 रोजी जाहिर करण्यात आला आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सदर माहितीची प्रिंट घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे इयत्ता 5 वी ते 8 वी ची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरीत करण्यात येईल असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी  – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उपयुक्त  –जिल्हाधिकारी किशन जावळे

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी