vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द..

राज्य प्रतिनिधी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेली प्रोजेक्ट 17ए श्रेणी मधील स्टेल्थ युद्धनौका प्रकारातील दुसरी नौका, यार्ड 12652 (उदयगिरी) हे 1 जुलै 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेली प्रोजेक्ट 17ए श्रेणी मधील स्टेल्थ युद्धनौका प्रकारातील दुसरी नौका, यार्ड 12652 (उदयगिरी) हे 1 जुलै 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. हा सेवेत सक्रिय असलेल्या शिवालिक वर्ग (प्रोजेक्ट 17) युद्धनौकांचाच एक भाग आहे. माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनिअर्स( जी आर एस ई ), कोलकाता येथे निर्मिती होत असलेल्या सात पी 17ए युद्धनौकांपैकी उदयगिरी ही दुसरी आहे.

या बहु-अभियान युद्धनौका ‘नील जल’ वातावरणातील परिचालनास सुयोग्य असून भारताच्या सागरी हितसंबंध क्षेत्रातील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. उदयगिरी हा त्याच्या पूर्वीच्या आयएनएस उदयगिरीचा आधुनिक अवतार आहे. हे एक वाफेवर चालणारे जहाज होते, देशाला 31 वर्षांची गौरवशाली सेवा दिल्यानंतर 24 ऑगस्ट 2007 रोजी ते निवृत्त झाले होते.

पी-17ए जहाजांमध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये आहेत आणि त्यात ‘अत्याधुनिक’ शस्त्रे आणि सेन्सर्स बसवले आहेत, जे पी17वर्गातील एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहेत. हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोमधील इन हाऊस डिझाइन क्षमतांमधील मोठी झेप दर्शविते. नवीन डिझाइन केलेली जहाजे ‘एकात्मिक बांधकाम’ या तत्वज्ञानाचा वापर करून देखील बांधली जात आहेत, ज्यामध्ये एकूण बांधकाम कालावधी कमी करण्यासाठी ब्लॉक टप्प्यांवर व्यापक पूर्व-सामग्री समाविष्ट आहे. आरंभ तारखेपासून 37 महिन्यांच्या विक्रमी वेळेत भारतीय नौदलाकडे उदयगिरी सुपूर्द करण्यात आले आहे.

उदयगिरीमुळे जहाजाची रचना, जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी कौशल्य यातील देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. 200 हून अधिक एमएसएमईंनी समर्थित असलेल्या मजबूत औद्योगिक परिसंस्थेने हे सक्षम केले आहे. या युद्धनौकेमध्ये स्वदेशी ओईएमकडून मिळालेली प्रमुख शस्त्रे आणि सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.

 

पी 17ए वर्गातील उर्वरित पाच जहाजे एमडीएल, मुंबई आणि जीआरएसई, कोलकाता येथे बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि 2026 च्या अखेरीला क्रमाक्रमाने उपलब्ध केली जातील.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला नवी दिशा, ₹1,00,000 कोटींची गुंतवणूक आणि 50,000 रोजगारांची संधी-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी, मुंबई येथे ‘52 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’चे वितरण

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत -वनमंत्री गणेश नाईक वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात जनता दरबार संपन्न जनता दरबारामध्ये 200 पेक्षा अधिक निवेदने प्राप्त

नववर्ष स्वागत : उपाहारगृहांना सूचना’एफडीए’ची ‘नववर्ष संकल्प- सुरक्षित अन्न मोहिम’

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील चार परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू- 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू 

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*