ठाणे जिल्ह्यात “कुष्ठरोग शोध मोहीम सुरूविना निदान कुष्ठरुग्ण शोधण्यावर भर; २,४३२ पथके करणार सर्वेक्षण..
ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) –केंद्र व राज्य शासनाने सन २०२७ पर्यंत कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करून शून्य प्रसार हे करण्याचे ध्येय असून ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम (Leprosy Case Detection Campaign – LCDC) १७ नोव्हेंबर, २०२५ ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे या मोहिमेत ग्रामीण भागात १००% आणि शहरी भागातील ३०% जोखीमग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी २,४३२ पथके घराघरांत जाऊन तपासणी करतील.
समाजात निदान न झालेले कुष्ठरुग्ण ओळखणे आणि त्यांना तात्काळ बहुविध औषधोपचाराखाली आणणे, तसेच नवीन संसर्गजन्य रुग्ण ओळखून संसर्गाची साखळी तोडणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कुष्ठरोग अनेकदा वेदना नसल्यामुळे लपून राहतो, त्यामुळे अनेकजण उपचार घेत नाहीत. त्यामुळे लवकर निदान आणि तातडीचा उपचारच या आजारावर नियंत्रणाचे मुख्य साधन आहे.
जिल्ह्यातील सद्यस्थिती एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५ अखेर ठाणे जिल्ह्यात ४०४ कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. कुष्ठरोग संशयित रुग्ण लवकर ओळखण्यासाठी आणि त्वरित उपचार उपलब्ध करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे मनोज रानडे (भा.प्र.से.) यांनी सर्व यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले आहेत.
सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा आणि स्वयंसेवकांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व डॉ. गंगाधर परगे (जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे) आणि सर्व म.न.पा. वैद्यकीय विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील मनुष्यबळ, जोखीम क्षेत्रे, सर्वेक्षण आवश्यकता यांचा सखोल अभ्यास करून कृती आराखड्यानुसार मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे, या संदर्भात डॉ. मनीष रेंघे (सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा – कुष्ठरोग) यांनी माहिती दिलीकुष्ठरोग “अधिसूचित आजार” घोषित महाराष्ट्र शासनाच्या दि. ३० ऑक्टोबर २०२५ च्या अधिसूचनेनुसार कुष्ठरोग हा “Notifiable Disease” घोषित केला असून सर्व शासकीय/खाजगी रुग्णालये, क्लिनिक, NGO, वैद्यकीय संस्था यांनी कुष्ठरुग्णांची माहिती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे, असे डॉ. सुहास माने (सहाय्यक संचालक – वैद्यकीय) यांनी सांगितले.कुष्ठरोग प्रमुख लक्षणे:• त्वचेवर फिकट किंवा लालसर, बधिर चट्टे• हात-पायात बधिरता किंवा अशक्तपणा• कानाच्या पाळ्या, चेहरा जाड, लालसर• त्वचेतील मज्जातंतूंची सूज/दुखणे• कोणत्याही वयोगटात होऊ शकतोकुष्ठरोगामुळे होणाऱ्या विकृती
Grade I विकृती• तळहात/तळपाय बधिर — जखमा, जखमा न भरणेGrade II विकृती• हात-पायाची बोटे वाकडी• मनगट/पाय लुळे पडणे• तळहात/तळपाय खोल जखमा डोळ्यांच्या पापण्या पूर्ण बंद न होणे कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, मात्र लवकर निदान अत्यावश्यक आहे. कुष्ठरोग तपासणीसाठी पथके घराघरांत भेट देतील. नागरिकांनी अडवणूक न करता तपासणी करून घ्यावी, तसेच संशयित लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे