vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम..

० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम..

 

 बुलढाणा, प्रतिनिधी: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमंतर्गत आज १ मार्चपासून जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार. आजारी आढळलेल्या बालकांवर तात्काळ उपचार केले जातील. गरजू व आजारी बालकांना औषधोपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व समुपदेशनाच्या सुविधा पुरविण्यात येतील.  या तपासणीसाठी नियुक्त पथकामध्ये पुरुष व महिला अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य सेविका यांचा समावेश आहे. उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या बालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, महापालिका रुग्णालये, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करारबद्ध रुग्णालये व आरबीएसके करारबद्ध रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळवले आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकाऱ्यांचे प्रयत्न राहणार

आहे.00000

संबंधित पोस्ट

स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभ • जिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण   • ३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

vishwatmaklokswamivarta

माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार

राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर 

vishwatmaklokswamivarta

📌आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात दर्जात्मक सुधारणांसाठी ठोस पावले उचला*  *रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना**वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूरक कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवा💊*औषधे खरेदी व वितरण तपासण्याच्या सूचना