vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

 

       आरोग्य प्रतिनिधी    मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामध्ये माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांनाही हानी होण्याची शक्यता असते. साधारणपणे मार्च ते मे या मान्सून पूर्वकाळात उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.

          लक्षणे- उष्णतेच्या किंवा अति उष्णतेच्या लाटेमुळे चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे, थकवा जाणवणे ही लक्षणे दिसून येतात.                                         या कालावधीत हवामान बदल होतात व या बदलांमध्येही आरोग्य उत्तम व निरोगी रहाण्यासाठी खालील बाबींचे पालन करा.

 

काय करावे –

Ø तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे (किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या.)Ø प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.Ø ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरावे आणि लिंबू पाणी, ताक /लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावी.

 

Ø टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी जास्त पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

Ø पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.Ø थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना तुमचे डोके झाकून ठेवावे त्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा.

Ø उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.

Ø हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवावा.

Ø थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाव्यात, त्यासाठी दिवसा खिडक्या आणि दारे बंद ठेवावीत

Ø स्वयंपाक करताना पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा.

Ø घराबाहेरील कामांचे नियोजन शक्य असल्यास दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत करा.

        काय करू नये

Ø उन्हात विशेषत: दुपारी १२:०० ते ० ३:०० या वेळेत बाहेर पडणे टाळावे.Ø दुपारच्या वेळी उन्हामध्ये असताना कठोर परिश्रम टाळावे.Ø अनवाणी बाहेर जाणे टाळावे.

Ø अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय पिणे टाळावे. Ø उच्च प्रथिनेयुक्त अन्न, आणि शिळे अन्न खाणे टाळावे.Ø उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना एकटे सोडणे टाळावे.

संवेदनशील किंवा जोखीमीचे घटक

Ø लहान अर्भके, लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेल्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब या व्यक्ती अति संवेदनशील आहेत.

Ø या लोकांना उष्णतेचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.

         वातावरणातील उष्णता ही नेसर्गिक चक्र आहे यामुळे त्याला सामोरे जाताना “काय करावे” व “काय करू नये” या सूचनांचे पालन केल्यास नवी मुंबईतील सर्व नागरिकांचे आरोग्य उष्माघातापासून सुरक्षित राहील आणि उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्वरित नमुंमपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

सिकलसेल तपासणी करून घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन सिकलसेल जनजागृती सप्ताह : ११ ते १७ डिसेंबर २०२५

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

📌आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात दर्जात्मक सुधारणांसाठी ठोस पावले उचला*  *रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना**वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूरक कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवा💊*औषधे खरेदी व वितरण तपासण्याच्या सूचना