vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एमआरआय, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर, पशुवैद्यकिय रुग्णालय व इतर आरोग्य सुविधांचे नवी मुंबईत लोकार्पण

एमआरआय, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर, पशुवैद्यकिय रुग्णालय व इतर आरोग्य सुविधांचे नवी मुंबईत लोकार्पण

        आरोग्य प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणा-या आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला जात असून आज लोकार्पण व शुभारंभ होणा-या वैद्यकिय सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री. गणेश नाईक यांनी या सेवा नवी मुंबईतील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जाव्यात असे सूचित केले. आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते वाशी सार्वजनिक रुग्णालयात संपन्न झाला त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करीत होते.

 यावेळी नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक तसेच आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ व उपसभापती श्री.गणेश सकपाळ, ब प्रभाग समिती सभापती श्रीम. रुपाली भगत, क प्रभाग समिती श्रीम. शैला पाटील, ड प्रभाग समिती सभापती श्री. प्रकाश मोरे, ई प्रभाग समिती सभापती श्रीम. चंद्रभागा मोरे, फ प्रभाग समिती सभापती श्रीम. ललिता मढवी, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. सलुजा सुतार, पाणी पुरवठा सभापती श्री. रविकांत पाटील, क्रीडा समिती सभापती श्री. गिरीश म्हात्रे, माजी महापौर तथा नगरसेवक श्री. जयवंत सुतार, श्री. सुधाकर सोनवणे, श्रीम. अंजनी भोईर त्याचप्रमाणे शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. माधवी इंगळे आणि इतर नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी सार्वजनिक रूग्णालय, सेक्टर 10, वाशी येथे –एम.आर.आय. सेंटर लोकार्पण, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग (सी.एस.एस.डी.) कार्यान्वित करणे, रूग्णालय बेड्स उपलब्धता डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, वाशी आणि ऐरोली येथे ह्रदयविकार उपचार केंद्र (कॅथलॅब) कामाचा शुभारंभ, मिल्क बँक सुविधा लोकार्पण, मॉड्युलर मॉर्च्युरी (शवागृह) कार्यान्वित करणे आदी सुविधांचे लोकर्पण व शुभारंभ प्रत्यक्ष स्वरुपात त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, से.8, सीबीडी बेलापूर येथील डायलिसीस सेंटर लोकार्पण आणि सेक्टर 24, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रूग्णालय लोकार्पण ऑनलाईन संपन्न झाले

या सोबतच नमुंमपा आणि ना.श्री.गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद भवन, से.14, वाशी येथील डायलिसीस सेंटरचे लोकार्पण आणि महापे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण प्रत्यक्ष स्थळी जाऊन मंत्री महोदयांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यामधील मिल्क बँक सुरु करण्याबाबतची मागणी व पाठपुरावा आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या वेळी बोलतांना महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी नागरिकांना पायाभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच वैद्यकीय सेवा पुरवितांना सेवाभाव व समर्पण भावना महत्वाची असल्याचे सांगत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी त्यादृष्टीने चांगले काम करत असल्याची भावना व्यक्त केली. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची बांधिलकी जपणारे काम करण्यासाठी महानगरपालिका कटीबध्द असल्याचे सांगत यापुढील काळात आणखी उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाईल असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईकर नागरिकांना खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध करुन घेण्यासाठी होणारी अडचण दूर करण्याच्या दृष्टीने विशेष डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा उपयोग जास्तीत जास्त नागरिकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पूर्वी जिवाणू-विषाणूजनक आजारांचे प्रमाण मोठे होते, आता जीवनशैलीवर आधारित आजार वाढले असल्याचे दिसून येत असून त्यादृष्टीने आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत नागरिकांची सर्वांगीण तपासणी केली जात असल्याची माहिती दिली. साधारणत: वाढत्या स्थुलपणामुळे आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका ठोस कार्यक्रम राबवित आहे असे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील पशुंची वाढती संख्या लक्षात घेऊन पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकिय रुग्णालय कार्यान्वित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅथलॅबच्या माध्यमातून हृदयाप्रमाणेच मेंदूवरही उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

          आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी आपल्या सभापतीपदाच्या कारकिर्दीत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात लोकार्पण व शुभारंभ होत असलेल्या आरोग्य सुविधांची विस्तृत माहिती दिली. आरोग्य समितीचे उपसभापती श्री.गणेश सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

0000

संबंधित पोस्ट

० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम..

भारती हॉस्पीटल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

vishwatmaklokswamivarta

पोषण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

टी.बी. मुक्त भारतासाठी “निक्षय मित्र” उपक्रमाअंतर्गत पोषण आहार किट वाटप

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा..

vishwatmaklokswamivarta