vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

 

बुलडाणा, प्रतिनिधी : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मेहकर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, मेहकर येथील निवडणूक विभाग येथे सोडत काढण्यासाठी सभा आयोजित करण्यात आले आहे.

तसेच अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती. नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होणार असुन उपविभाग मेहकर अंतर्गत मेहकर तालुक्याचे स्त्रियांकरिता आरक्षण सोडत ठिक दुपारी 2 वाजता जिल्हानियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडती करीता मेहकर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत मेहकर तहसिलदार निलेश मडके यांनी कळविले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

वीर यशवंतराव घाडगे यांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचवा  –महिला व बालविकास मंत्री ना.कु.आदिती तटकरे,माणगाव येथे व्हिक्टोरीया क्रॉस विजेते वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती उत्साहात साजरी..

vishwatmaklokswamivarta