vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

राज्य प्रतिनिधी अलिबाग:- रायगड जिल्हा जगाच्या नकाशावर पर्यटन जिल्हा घोषित झाल्यापासून अलिबाग तालुक्यात प्रचंड पर्यटकांचा ओघ वाढला असून जाणे-येणे पेझारी येथून असते येथे शहापूर, कुर्डुस कडून वाहतूक वाढली असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे.मात्र आता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोन चाकी,चार चाकीचा अपघात होऊन मृत्यु झाल्यास 6लाख रुपये आणी जखमींना रुपये 50हजार ते 2 ते 50लाख मिळणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय मुतीॅ श्रीमती रेवती मोहिते आणी न्याय मुतीॅ श्री.संदेश पाटील यांच्या खंडपीठाने दिला असल्याची माहीती आंबेपुर ग्रामपंचायत ने आयोजित केलेल्या आपत्ती सुरक्षा कार्यशाळेत आपत्तीव्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.यावेळेस स्व. मीनाक्षी ताई पाटील सभागृहात व्यासपीठावर प्रशासक श्री.समीर पाटील, डॉ.जयपाल पाटील अँड. गोपाळ शेळके,ग्रामविकास अधिकारी श्री.विलास म्हात्रे हे उपस्थित राहुन मान्यवरांकडून छत्रपती शिवाजीमहाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.प्रास्ताविकात श्री.समीर पाटील म्हणाले पेझारीनाका चहूबाजूने गजबजला असुन हायस्कूल मुळे शेकडो विद्यार्थी येतात त्या मुळे अपघात झाल्यास काय करावे,घरातील सिलेंडर, वीज बाबत सुरक्षेबाबत ग्रामपंचायत ने जागतिक पातळीवर प्रशिक्षण घेतलेले डॉ.जयपाल पाटील यांना आमंत्रित केले असून ते माहिती देतील ती शेजारांना सांगावी असे सांगितले. यानंतर महिलांविषयक नवे कायदे अँड. गोपाळ शेळके यांनी दिली.महिला सुरक्षेसाठी पोयनाड पोलीस ठाण्यातून पोलीस हवालदार श्री.नवनाथ म्हात्रे यांनी सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस 112क्रमांकाचा वापर कसा करावा बाबत माहीती दिली.महिलांना बाळंतपणातशासनामार्फत 102 रुग्ण वाहिकेचा प्राथमिक आरोग्य केंद्र पेझारी प्रमुख डॉ.पदश्री आंदळकर यांनी वाहन चालक श्री.प्रमोद पाटील यांना 102 घेऊन पाठविले.रस्त्यावरील अपघाता बाबत न्याय मुतीॅ महोदयाने नुकसान भरपाई 6ते8आठवडयातच देण्यात यावी.अपघाताला जबाबदार ठेकेदार व शासकीय अधिकारी असुन याला शहरात स्थानिक स्वराज्य संस्था व बाहेर सार्वजनिक बांधकाम विभाग असणार आहेत या महत्वपूर्ण निकालाचे नागरिक अभिनंदन करतानां नाक्यावर दिसत आहेत. त्या बरोबर घरातील गॅस सिलेंडर, वीज, याची माहीती,व रुग्णवाहिकेपर्यंत रुग्णास कसे हाताच्या घडीवर, चादरीत नेण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळेस आशाताई विदया म्हात्रे, सिद्धी पालक,अंगणवाडी सेविका रुपाली खंडागळे, स्वेता केळकर,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार ग्रामविकास अधिकारी श्री.विलास म्हात्रे यांनी मानले

संबंधित पोस्ट

ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी नाही

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये एकदिवसीय जिल्हा परिषद ठाणे येथे संवेदनशीलता कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी…

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा १० वरुन १५ लाख रुपये…