vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

राज्य प्रतिनिधी-

 नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेक्सस सीवूड मॉल, सेक्टर 40, नेरूळ येथे दि. 26 एप्रिल 2026 रोजी प्रथमच ‘आयबीए ग्लोबल बॉक्सिंग सिरीज (IBA Global Boxing Series)’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन संध्या. 6 ते 9 वा. या वेळेत मरिन बॉक्सींग ॲकेडमी या बॉक्सिंग क्षेत्रातील नामांकित संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

 नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाचे सहकार्य या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी असणार असून यामध्ये जगभरातील नामांकित बॉक्सर सहभागी होणार आहेत. भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुप्रसिद्ध बॉक्सर श्रीम.मेरी कोम यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचे आकर्षण अधिक वाढणार असून क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे नवी मुंबई शहराची स्मार्ट व स्पोर्ट्स सिटी अशी जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार असून युवकांमध्ये क्रीडाविषयक प्रेरणा निर्माण करणारी ही स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

 तरी नागरिकांनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-लालबागचा राजाचे, प्रथम दर्शन घ्यावा दर्शनाचा लाभ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!! दर्शनाचा लाभ सर्वांसाठी प्रसिद्धी माध्यमांसाठी सदरचे live प्रक्षेपण आमच्या या- https://vishwatmaklokswamivarta.com/ वेबसाईट लिंक पहा

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे निधन झाले आहे, त्या 101 वर्षांच्या होत्या. 

ग्रामपंचायत सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा

विशेष लेख-आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा