vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद

 आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद “

 

नांदेड प्रतिनिधी- भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (MYAS) यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), फिट इंडिया, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने व सांयन्स कॉलेज,नांदेड यांच्या सहकार्याने दिनाक 08 मार्च,2026 रोजी “आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त” “अस्मिता महिला लीग” स्पर्धाचे आयोजन सांयन्स कॉलेज मैदान, नांदेड करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन मा.डॉ.अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड, मा.श्रीमती चंदा रावळकर, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत भारत सरकार, मा.श्री.प्रलोभ कुलकर्णी, नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटना, मा.श्रीमती शिवकांता देशमुख, राज्य क्रीडा मार्गदर्शक, मा.डॉ.अश्विन बोरीकर, क्रीडा संचालक, सांयन्स कालेज, नांदेड, मा.श्री.संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी, मा.श्री.राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी, मा.श्री.नागनाथ डांगे, सेवानिवृत्त तहसिलदार धाराशिव आदी मान्यवर उपस्थित होते. तर विजेत्या खेळाडूंना मा.डॉ.एल.पी.शिंदे, प्राचार्य, सायंन्स कॉलेज,नांदेड यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

उदघाटनीय कार्यक्रम मनोगत प्रसंगी डॉ.अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) यांनी उपस्थित खेळाडूंना महिला हया प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून शासनामार्फत प्रत्येक क्षेत्रामध्ये मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आपल्या सवयीमध्ये बदल करुन प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

“आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त” “अस्मिता महिला लीग” यामध्ये जिल्हयातील 150 ते 200 मुली व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्याचा अंतिम अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.

13 वर्षाआतील -100 मी.धावने- प्रथम, सई बालाजी पतंगे- शाकुंतल इं.मे.स्कुल, नांदेड, द्वितीय- संगीता बबन मटके- जि.प.प्रा.शा.पार्डी ता.लोहा, तृतीय- संधीती गजानन डिकळे- जि.प.प्रा.शा. पार्डी

200 मी.धावने- प्रथम- शुभश्री बळीराम पवार- जि.प.प्रा.शा.पार्डी, द्वितीय- सई बालाजी पतंगे- शाकुंतल इं.मे.स्कुल, नांदेड, तृतीय- कोमलकोट रामसिंग बावरे- अशोक प्र.विदयालय, विष्णुनगर, नांदे

400 मी.धावने- प्रथम- वेदिका विश्वनाथ मोखले- जि.प.प्रा.शाळा,पार्डी, द्वितीय- कोमलकौर बावरी- अशोक प्रा. विदयालय, विष्णुनगर, नांदेड, तृतीय- जागृती मिलींग गजभारे- सचखंड पब्लिक स्कुल, नांदेड

13 ते 18 वर्षाआतील -100 मी.धावने- प्रथम, श्रेया संजय सुदेवाड-शासकीय आश्रमशाळा,दुधड ता.हि.नागर, द्वितीय- मुक्ताई परमेश्वर इजेपवार, शासकीय आश्रमशाळा,दुधड तृतीय- ओमीका किरण पाटील- पिपल्स हायस्कुल, नांदेड

200 मी.धावने- प्रथम- श्रेया संजय सुदेवाड-शासकीय आश्रमशाळा,दुधड ता.हि.नागर, द्वितीय- श्रृध्दा बालाजी कुलुपवार, के.आर.एम.ज्यु.कॉलज,नांदेड, तृतीय- आरती पवार- श्री संत गाडगे महा वि. लोहा

400 मी.धावने- प्रथम- श्रृध्दा बालाजी कुलुपवार, के.आर.एम.ज्यु.कॉलज,नांदेड, द्वितीय- श्रृध्दा परमेश्वर मुंडकर- पीएम श्री केंद्रीय विदयालय, नांदेड, तृतीय- वनिता संतोष कल्याणकर- जिल्हा परिषद हायस्कुल, बारड ता.मुदखेड

18 वर्षापुढील मुली व महिला -100 मी.धावने- प्रथम, तेजस्विनी संघरत्न कांबळे- सायंन्स कॉलेज, नांदेड द्वितीय- पालनवार प्रियंका संतोष, शांतीनिकेतन हाय, कुंटूर, तृतीय- प्रिती बालाजी- डी.बी.कॉलेज, भोकर ता.भोकर

200 मी.धावने- प्रथम- स्वाती रामभाडफ ठोंम्बरे- डी.एस.एम.कॉलेज, परभणी, द्वितीय- तेजस्विनी संघरत्न कांबळे- सायंन्स कॉलेज, नांदेड, तृतीय- विदया बालाजी खरबे, बळीराम पाटील विदयालय, पेणूर ता.लोहा

400 मी.धावने- प्रथम- अश्विनी लोकडोबा कस्तुरे, कृष्णा विदयालय, सिंधी ता.उमरी, द्वितीय- तेजस्विनी संघरत्न कांबळे- सायंन्स कॉलेज, नांदेड, तृतीय- कोमल विश्वनाथ गाडगे- सायंन्स कॉलेज, नांदेड

या स्पर्धेकरीता पंच प्रमुख म्हणुन श्री.प्रलोभ कुलकर्णी हे होते तर पंच म्हणुन श्री.वैभव दोमकोंडवार, श्री.ज्ञानेश्वर सोनसळे, श्री. अजय राठोड, श्री.गणेश उदाडे आदीनी काम केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ.अश्विन बोरीकर यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरीता मा. जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी श्री. विजय काकडे, क्रीडा अधिकारी श्री.संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, (क्रीडा अधिकारी) राहुल श्रीरामवार, विपुल दापके, श्रीमती रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटक गाईड, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, रोहीणी घंटेवाड संजय चव्हाण, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार चे अधिकारी/कर्मचारी, नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे खेळाडू आदि सहकार्य केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

शफाली वर्माच्या कामगिरीवर लक्ष; भारताची आज लढत मलेशियाशी

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

वरिष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२५खुल्या राज्य निवड चाचणी…

vishwatmaklokswamivarta

इजिप्तमधील जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेतून भारताची माघार, इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धांना अलिबाग मध्ये सुरुवात