vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर…

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर…

मुंबई, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले.कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ एका कामगाराची निवड केली जाते. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी राज्यभरातून ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नोकरी करत असतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे येत्या १३ मे रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

2024 च्या पुरस्कारासाठी अर्ज

सन २०२४ मधील विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया २८ एप्रिल २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे अर्ज मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येतील. हे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ मे २०२५ आहे.

पुरस्काराचे स्वरुप -कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येते, तर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते.

पुरस्कार्थींची नावे – कामगार भूषण पुरस्कार :श्रीनिवास कोंडिबा कळमकर, मल्टिस्कील ऑपरेटर, बजाज ॲटो लिमिटेड, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार :१) नेहा विलास भांडारकर, भारतीय आर्युविमा महामंडळ, नागपूर,२) महेश मधुकर सावंत-पटेल, सीमेन्स लिमिटेड,ठाणे-बेलापूर रोड, ठाणे३) चंद्रकांत महादेव कांबळे, बजाज ॲटो लिमिटेड,वाळूज, छत्रपती संभाजीनगर४) दादासाहेब सुरेंद्र भंडे, स्कोडा ॲटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.,छत्रपती संभाजीनगर५) नरेंद्र शंकर गोखले, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, ता.अलिबाग, जि.रायगड.६) विजय रामेश्वर बोराडे, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खामगांव, जि.बुलडाणा७) सचिन लक्ष्मण पिंगळे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, बुलडाणा८) संदीप सतीश रांगोळे, टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड, पिंपरी, पुणे९) उमेश रामचंद्र फाळके, टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड, पिंपरी, पुणे

 राजकुमार गुलाबराव किर्दत, अल्फा लावल इंडिया लिमिटेड,सातारा11) नामदेव रामसा उईके, सी.आय.ई. ॲटोमोटिव्ह इंडिया कास्टींग लि., उर्सेगांव, ता.मावळ, जि.पुणे12) निमीषा नितीन मोहरीर, भारतीय जीवन बिमा निगम, नागपूर13) दिगंबर शंकरराव पोकळे, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरुड, पुणे14) दत्तात्रय सुखदेव दगडे, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि., निघोजे म्हाळुंगे खराबवाडी, ता.खेड, चाकण, पुणे15) संजय जयसिंग देशमुख, थरमॅक्स लिमिटेड, चिंचवड, पुणे16) विकास चंद्रकांत धुमाळ, महाराष्ट्र स्कुटर्स लि., सातारा लि.आकुर्डी, पुणे17) बद्रिनाथ शिवनाथ भालगडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिल्लोड, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर18) प्रविण बबन जाधव, गोदरेज ॲण्ड बॉईज, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.,शिंदेवाडी, शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा19) मनोज अनंत पाटील, टाटा स्टील लिमिटेड, एम.आय.डी.सी., तारापूर, जि.पालघर20) सुनिता रविंद्र परमणे, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, पोफळी, ता.चिपळूण, जि. रत्नगिरी21) प्रकाश बाबुराव चव्हाण, टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेड चिखली, पुणे22) शिवराज दादासो शिंदे, प्रिमियम ट्रांन्समिशन प्रा.लिमिटेड,चिंचवड, पुणे23) कविता नरेश भोसले, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय, वडाळा (पूर्व), मुंबई24) मनोज देविदास गवळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे25) रविंद्र बाबाजी जाधव, विचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि., कांदिवली (प), मुंबई26) मारोती सदाशिव पिंपळशेंडे, चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,ऊर्जानगर27) साखरचंद मारुती लोखंडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे28) देविदास पंडीत पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळेकिसन दामोधर नागरकर,महाराष्ट्र राज्य विद्दुत पारेषण कंपनी मर्यादित बल्लारशाह३०) रविंद्र किसनराव रायकर, कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरुड, पुणे31) वंदना अशोक मनपे, चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, ऊर्जानगर, चंद्रपुर32) विवेक सर्जेराव रावते, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, इस्लामपुर,ता.वाळवा, जि.सांगली33) देवकी ओमप्रकाश कोकास, बिल्ट पेपर ग्राफिक्स प्रॉडक्ट लिमिटेड, बल्लारपूर, पेपर मिल्स, चंद्रपूर34) एकनाथ रमेश उगले, थरमॅक्स लिमिटेड, चिंचवड, पुणे35) राजेंद्र ज्ञानदेव कांबळे, दि कराड को-ऑप.बँक लिमिटेड, कराड36) संजय दगु गोराडे, किमप्लास पाईपिंग सिस्टीम प्रा.लिमिटेड,अंबड, नाशिक37) नितीन आनंदराव देडगे, वनाझ इंजिनिअर्स लिमिटेड, कोथरुड, पुणे38) सुनिल गुंडू दळवी, विभाग नियंत्रक यांचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर39) पोपट चंदु रसाळ, स्टरलाईट टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर40) अजित अनंत कामतेकर, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ, ता.अलिबाग, जि.रायगड41) गुणवंत वसंतराव भारस्कर, महाराष्ट्र राज्यल विद्युत वितरण कंपनी लि., वाशिम42) नंदकुमार साहेबराव पाटील, गोदरेज ॲण्ड बॉईज मॅ.कंपनी लिमिटेड, फिरोजशहा नगर, विक्रोळी, ठाणे43) संजय दिनकर चव्हाण, किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड, खडकी, पुणे44) सचिन मारुती पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे आगार, जि.ठाणे45) विजय काशीराम नंदागवळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर रोड, भंडारा46) भारत गोरख मांडे, केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, माळेगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक47) शिवाजी नागनाथराव राऊत, मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,वाळुज, छत्रपती संभाजीनगर48) अमोल अशोक आळवेकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर आगार, जि. कोल्हापूर49) दिपक वसंतराव पाटील, हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड,ओझर (मिग), ता.निफाड, जि. नाशिक50) विलास मोरेश्वर पंचभाई, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेड, सातपूर नाशिक51) अनंत अशोक शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जळगाव

0000-

संबंधित पोस्ट

डोंगरी महोत्सव विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई 

पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम

भारत 6 डिसेंबरपासून चंदीगड येथे चार दिवसीय इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF 2025) चे आयोजन करणार डॉ. जितेंद्र सिंह यांनी IISF 2025 च्या तयारीचा घेतला आढावा; हा महोत्सव भारताच्या विज्ञान-आधारित आणि नवोन्मेष-प्रेरित राष्ट्रामध्ये झालेल्या परिवर्तन प्रदर्शित करणार

vishwatmaklokswamivarta

भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा यात्रा

ठाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी1700 कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी देणार   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हा वार्षिक योजना (2026-27) राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न

vishwatmaklokswamivarta

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा