vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

 रायगड-अलिबाग प्रतिनिधी,: सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे दिनांक 1 जुलै 2026 पासून प्रशिक्षणाच्या सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांनी दि.30 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी महेश खरात यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.  त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :-प्रशिक्षण कालावधी- 01 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 (6 महिने) आहे.

आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे. उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाकिंत प्रत जोडणे आवश्यक, क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. तसेच विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण शुल्क :- i) प्रतिमाह रु. 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. ii) दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.)

प्रशिक्षणामुळे रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी असून i) राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थ सहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. ii) सरकारी किवा खाजगी विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते. संपर्कासाठी पत्ता:- महेश किसन खरात, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी मो.क्र.7758969112 किंवा श्री. धीरज शहुराव भोयर, मोबाईल व Whas app क्र. – 9860254943, यांत्रिक निदेशक, रायगड-अलिबाग, मत्स्यसंकुल इमारत, अलिबाग कोळीवाडा, कस्टम कार्यालयाच्या बाजूला,अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड. पिन-402201 ईमेल : ftoalibag@rediffmail.com

तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व Whas app मो.क्र.7758969112 व क्र. 9860254943 सपंर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येइल. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेऊन दिनांक 30 जून 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमुद Whas app किवा ईमेल सादर करावेत.

00000

संबंधित पोस्ट

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करा-आढावा बैठकीत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश’नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा असे काम करा…

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

रोजगार हमी योजनेतील जुनी अपूर्ण कामे आठ दिवसात पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर

जिल्हा कार्यकारी समितीची बैठक-कैद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करा-जिल्हाधिकारी स्वामी