vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

 

रायगड -अलिबाग, प्रतिनिधी : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पादत्राणे दुरुस्ती व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवसाय करता यावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या गटई स्टॉल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० पात्र लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले.

मुलांचे शासकीय वसतिगृह, वरसोली (अलिबाग) येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले. यावेळी शासनाच्या १०० टक्के अनुदान योजनेअंतर्गत स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात रु. ५ हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गटई स्टॉलधारकांचे अभिनंदन केले. तसेच व्यवसाय अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत उपलब्ध प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, तसेच व्यवसाय विस्तारासाठी विश्वकर्मा कर्जयोजना आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केल

शासनाच्या या उपक्रमामुळे रस्त्याच्या कडेला उन्हात, वाऱ्यात आणि पावसात बसून सेवा देणाऱ्या चर्मकार समाजातील व्यावसायिकांना सुरक्षित व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून त्यांच्या आर्थिक उन्नतीलाही चालना मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सुनिल जाधव तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार 

vishwatmaklokswamivarta

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..