vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

गुंतवणूकदार उद्योजकांचे कोकण विभागात स्वागत..उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रशासन कटिबद्ध-विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

गुंतवणूकदार उद्योजकांचे कोकण विभागात स्वागत..उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रशासन कटिबद्ध-विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

 

ठाणे, प्रतिनिधी- कोकण विभागामध्ये औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी, याकरिता सामूहिक प्रयत्न करण्यात येतील. यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.

कोकण विभागातील गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे, त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे तसेच त्यांच्या पोलीस विभागाकडील अडचणी यासाठी प्रभावीपणे हाताळणे याबाबत कार्यकारी समितीची बैठक कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय सभागृह, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त / पोलीस अधिक्षक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील संबंधित प्रादेशिक अधिकारी, मैत्री नोडल अधिकारी, पर्यटन, आरोग्य, शिक्षण इ. विभागाचे अधिकारी, उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर, कोकण विभागातील जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक, नामांकित शैक्षणिक संस्था प्रतिनिधी, इ. अधिकारी तसेच कोकण विभागातील औद्योगिक संघटना- फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज, टिसा, तळोजा इंडस्ट्रिज असोशिएश्न, रोहा इंडस्ट्रिज असोशिएशन, लोटे परशूराम औद्योगिक संघटना, वसई-विरार इडस्ट्रिज असोशिएशन, लघु उद्योग भारती, इ. चे अध्यक्ष, तथा प्रतिनिधी तसेच औद्योगिक वसाहती – जवाहर सहकारी औद्योगिक वसाहत, खोपोली औद्योगिक वसाहतचे प्रतिनिधी व्ही.सी. द्वारे बैठकीस उपस्थित होते.

तसेच अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) कोकण विभाग संजय पलांडे, उद्योग सह संचालक, कोकण विभाग श्रीमती विजू शिरसाठ, उप आयुक्त (पुरवठा), कोकण विभाग अनिल टाकसाळे, ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, उद्योग उप संचालक, कोकण विभाग श्रीमती सी.वि.पवार, पोलीस उपनिरिक्षक (स्पेशल ब्रांच) नवी मुंबई गणेश जाधव, प्रादेशिक अधिकारी, (म.औ.वि.म.)-ठाणे-2 सुनिल भुताळे, प्रादेशिक अधिकारी, (म.औ.वि.म.)-पनवेल डॉ.संतोष थिटे, प्रादेशिक अधिकारी, (म.औ.वि.म.)-महापे महेंद्र पटेल, प्रादेशिक अधिकारी, (म.औ.वि.म.)-ठाणे-1 उदय किसवे, ॲडमिन हेड, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज ऑफ इंडिया रविंद्र सावंत, डायरेक्टर, मे. कपूर ग्लास संजीव कपूर, डायरेक्टर, तळोजा इंडस्ट्रिज असोशिएशन सतिश शेट्टी, प्रादेशिक अधिकारी, एम.सी.ई.डी. श्री. डी.यु. थावरे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस उद्योग सह संचालक, कोकण विभाग श्रीमती विजू शिरसाठ यांनी आपल्या प्रास्ताविकात गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे. व्यापारी / कामगार वर्गाच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी सोडविणे. गुंतवणूकदार उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करणे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील !

vishwatmaklokswamivarta

ऑरिक हॉल, शेंद्रा मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना,कार्यालयासाठी सवलतीच्या दरात भाड्याने जागा उपलब्धतेचा निर्णय

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

vishwatmaklokswamivarta

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत