vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.दि.१ जुलै, २०२६ ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांनी केले आहे.

 १६ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार, या योजनेद्वारे पात्र जेष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रती महिना ५,००० रुपये मानधन दिले जाते.अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे (दिव्यांगांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे). कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

तसेच, अर्जदार इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा.इच्छुक आणि पात्र साहित्यिक,कलाकारांनी आपले अर्ज महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १ जुलै, २०२६ ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि बँक तपशिलासह आवश्यक. अपंगत्व दाखला लागू असल्यास केंद्र किंवा राज्य सरकार पुरस्कार प्रमाणपत्र असल्यास तसेच नामांकित संस्था किंवा व्यक्ती यांच्या शिफारस पत्र व या संबंधित विविध पुरावे याची कागदपत्रे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

00000

संबंधित पोस्ट

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत  मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी रस्ते सुधारणा कामांची केली आकस्मिक प्रत्यक्ष पाहणी,गुणवत्ता राखून जलद कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*

एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा…