vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी रस्ते सुधारणा कामांची केली आकस्मिक प्रत्यक्ष पाहणी,गुणवत्ता राखून जलद कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी रस्ते सुधारणा कामांची केली आकस्मिक प्रत्यक्ष पाहणी,गुणवत्ता राखून जलद कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

          नवी मुंबई प्रतिनिधी-  पावसाने उघडीप घेतल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागामार्फत रस्ते सुधारणा कामांना वेग देण्यात आला असून आज आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांच्यासह सीवूड परिसरातील रस्ते बांधकामांची पूर्वसूचना न देता आकस्मिकरित्या प्रत्यक्ष जागी पाहणी करुन कामाची गुणवत्ता राखत कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे उपस्थित होते

   यावर्षी मे महिन्यापासून संतत पर्जन्यवृष्टी असल्यामुळे ज्याठिकाणी खड्डे पडले आहेत त्याच्या पूर्णपणे दुरुस्तीसाठी अनेक अडचणी उद्भवल्या. तसेच विविध नागरी सेवांसाठी वेगवेगळया प्राधिकरणांमार्फत रस्ते खोदण्यात आले होते. पावसाळी कालावधीमुळे त्यांचे व्यवस्थित पुनर्पृष्ठीकरण शक्य झाले नाही. त्या अनुषंगाने नागरिकांकडूनही रस्त्यांबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यास अनुसरुन रस्ते सुधारणा कामांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे निर्देश आयुक्त महोदयांकडून अभियांत्रिकी विभागास देण्यात आले होते. त्यानुसार सर्वच विभागांमध्ये रस्ते सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.

   या कामांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी आयुक्तांनी सीवूड परिसरात से.46, 48 व 50 या परिसरातील रस्ते सुधारणा कामांना पूर्वसूचना न देता आकस्मिक भेट दिली व त्याठिकाणच्या अस्फाल्टींग कामाचे परीक्षण केले. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागाचे व्यवस्थित पुनर्पृष्ठीकरण करण्यात यावे. प्रथमत: रस्त्याचे खड्डे व उतार दुरुस्ती आवश्यकतेनुसार बीएम थराने करुन घ्यावी व रस्त्याचे पृष्ठीकरण डांबरीकरणाने (A.C.) करण्याची काळजी घ्यावी तसेच डांबराचे थर टाकतांना तापमान 120 डिग्री सेंटीग्रेडच्या कमी नको याची काळजी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले व सुरु असलेल्या कामाच्या तांत्रिक बाबींची खातरजमा करुन घेतली. यामध्ये अक्षर सिग्नलजवळील रस्ता, एलअँडटी ब्रीज जवळील चौक, नवीन से.50 मुख्य रस्ता अशा विविध भागातील रस्त्यांच्या कामाची आयुक्तांनी बारकाईने पाहणी केली.

 कामे करतांना गुणवत्ता राखणे गरजेचे आहे हे स्पष्ट करीत ही कामे 8 ते 10 दिवसात जलद पूर्ण करावीत तसेच त्याठिकाणचे जलवाहिन्यांचे कामही तत्परतेने करण्यात यावे असे निर्देश देतानाच या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करुन घ्यावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या व होणा-या तक्रारी व सूचनांनुसार सर्वच विभागांमध्ये रस्ते सुधारणा कामांना वेग द्यावा व कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असेही स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत अभियांत्रिकी विभागास देण्यात आले.

000000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

मुंबईतील धारावी विभागामध्ये भाजपा वतीने तिरंगा यात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबागचा राजाचा 2025 विसर्जन सोहळा थेट प्रक्षेपण पहा “विश्वात्मक लोकस्वामीवार्ता” वेब पोर्टलवर-:-https://vishwatmaklokswamivarta.com/ या घ्या गणपती बाप्पाचे दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या….

vishwatmaklokswamivarta

फास्टट्रॅग चा नवीन पास:आता देशभर फिरण्यासाठी नवा टोल पास फायदा?

वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी यांनी घेतला आढावाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधाचे काम समन्वयाने व गतीने पूर्ण करा

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद