vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद

मुंबई प्रतिनिधी –

नुकताच माहीम येथे ज्यष्ठ नागरिकांचा एकमेकांशी होणारा होणारी चर्चा म्हणजे”संवाद” ज्येष्ठ नागरिक संघ माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी (आयुर्वेदिक सल्लागार एम् डी. डॉक्टर) वैद्य सत्यव्रत रमेश नानल यांना आमंत्रित करण्यात आले होते.

संवाद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुधीर नाईक यांनी वैद्य श्री सत्यव्रत नानल आणि सर्व ज्येष्ठांचे स्वागत केले.

आजच्या या कार्यक्रमाला फेस्कॉमच्या जनसंपर्क प्रमुख श्री दिलीप गाडेकर यांची उपस्थिती लाभली.  श्रीमती उज्ज्वल पाठारे यांनी वैद्य नानाल यांचा परिचय करून दिला.

   दादर, शिवाजी पार्क, माहीम येथे सुप्रसिद्ध असलेले वैद्य नानल यांची, आयुर्वेदात पारंगत असणाऱ्या चौथ्या पिढीतील वैद्य सत्यव्रत नानल आहेत. वैद्य नानल यांच्या घराण्याने संशोधनांद्वारे अनेक फॉर्मुले तयार केले आहेत. त्यांची अनेक पुस्तके आणि मॅगझिन्स प्रकाशित झालेली आहेत. टिव्ही वर त्यांच्या अनेकदा मुलाखती झालेल्या आहेत.

   वैद्य सत्यव्रत नानल यांनी अतिशय साध्या सोप्या ओघवत्या भाषेत सर्व ज्येष्ठ नागरिकांना डोक्यावरील केसापासून तळ पायाच्या नखापर्यंत सर्व गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगितलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी करायच्या सोप्या सोप्या घरगुती गोष्टी उदाहरणार्थ मायग्रेन आणि डोकेदुखी यातील फरक, तोंडात तेल पकडून ठेवणे, योग्य शौच्य म्हणजे काय, अंगाला तेल कसे लावावे, डोळे- कान यांची काळजी कशी घ्यावी, नस्य म्हणजे काय आणि कसे करावे इत्यादी त्यांनी सर्वांना सांगितले‌. “कोणी विचारलं तर वय 60 सांगायचं नाही अजून 42 वर्ष बाकी आहे असे सांगायचं”. आत्ताच्या ह्या युगात लोकांचे आयुर्मान वाढले आहे. लोक शंभरी पार करतात. “शतायुषी” होतात‌. अशी जगण्याची उमेद त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिली.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती “उज्ज्वल पाठारे” यांनी वैद्य सत्यव्रत नानल यांचे आभार मानले आणि कॉफी पानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाचे वृत्त संकलन ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी केले

संबंधित पोस्ट

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…

बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’राबवणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…

रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta