vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

      नवी मुंबई प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पशू जन्म नियंत्रण कार्यक्रम कायदयाची अंमलबजावणी सुरु असून त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याकरीता 2006 पासून तुर्भे येथे श्वान नियंत्रण केंद्र कार्यरत आहे. भटक्या श्वानांच्या तक्रारी नोंदविण्याकरिता 24 X 7 हेल्पलाईन क्रमांक 9320056585 कार्यरत आहे.

          मा. सर्वोच्च न्यायालयाची SUO MOTO WRIT PETITION (CIVIL) No.5 of 2025 नुसार दि. 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या आदेशान्वये, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये ज्याप्रमाणे प्राण्यांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे प्राणीप्रेमींनी कायदयान्वये जी काळजी घ्यावयाची त्याचीही अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात भटक्या श्वानांचे चावणे, मागे लागणे, लहान मुलांना भीती वाटणे व काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी दररोज श्वानांना खादयपदार्थ टाकले जात असल्याबाबत विविध स्तरातील नागरिकांमार्फत अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.

          तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि.07/11/2025 रोजीच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निवडलेल्या ठिकाणी व ठराविक वेळेत श्वानांना खाऊ घालणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, नमुंमपामार्फत ठरवून देण्यात येणाऱ्या ठराविक Feeding Spot वर, ठराविक वेळेत श्वानांना खाऊ घालता येईल, जेणेकरुन इतर नागरिकांना याचा त्रास होणार नाही. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाचे व प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात सूचित करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या नियोजनाचामहिला व बाल विकास मंत्री कु तटकरे यांनी घेतला आढावा..

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विधानसभा प्रश्नोत्तर -सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

vishwatmaklokswamivarta

विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta