vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महसूल दिन गुणगौरव सोहळा संपन्न अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक   –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महसूल दिन गुणगौरव सोहळा संपन्न अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक   –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड प्रतिनिधी:- महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन हॉल येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदि उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महसूल विभाग हा शासनचा कणा असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून हे उपक्रम योग्यरितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान्यांशी संबंधित विभाग आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे यासाठी महसूल दिन साजरा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते त्यांना देणे व काही अडी अडचणी सोडविल्या जातील असेही त्या यावेळी म्हणाल्या. शासनाने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान असे अनेक उपक्रम राबविले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान राबविले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यात सक्षम झाली पाहिजे याकरिता प्रत्येक कार्यालयात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली पाहिले असेही त्या यावेळी म्हणाल्या.

रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले म्हणाले की, शासन हे गोरगरीब जनतेचे आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला ज्या बाबी आवश्यक आहे ते देणे आपले कर्तव्य आहे ही भावना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनाशी ठेवून काम केले पाहिजे. याकरिता सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम करावे अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. महसूल विभागाने हाती घेतलेली कामे अशीच पुढे सुरु ठेवावीत. नागरिकांना आवश्यक असलेले दाखले, इतर दाखले देण्याचे काम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, महसूल विभागामार्फत दि. 1 ऑगस्ट पासून ते दि.7 ऑगस्ट पर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच दि.1 ऑगस्ट पासून ते दि.7 ऑगस्टपर्यंत या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.या महसूल पंधरवडानिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 2 ऑगस्ट: अतिक्रमण नियमानुकूल करणार 31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. दि.3 ऑगस्ट: शेत रस्त्यांचे वाद मिटवणार ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण होईल, आणि झाडे तोडल्यास वनविभागाच्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. दि.4 ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल. वर्षातून चार वेळा अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. दि.5 ऑगस्ट: डिबिटी अडचणी दूर करणार, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डिबिटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तलाठी घरोघरी भेटी देतील आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दि.6 ऑगस्ट: शर्तभंग जमिनी परत घेणार-शासकीय जमिनींच्या शर्तभंग प्रकरणांचे सर्वेक्षण होऊन अतिक्रमण किंवा शर्तभंग आढळल्यास त्या जमिनी शासनाकडे परत घेतल्या जाणार आहेत. दि.7 ऑगस्ट: एम सँड धोरण आणि सांगता समारंभ होणार आहे.यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची सनद वाटप, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड, उत्कृष्ट कर्मचारी, महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळअधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची सनद वाटप :-कांचन काशिनाथ भुरे,अलिबाग,चिंचवली, अरविंद अंबाजी पाटील झिराडपाडा अलिबाग, दीपक वसंत गावडे, झिराडपाडा अलिबाग, उत्सव प्रभाकर पवार, अलिबाग, झिराडपाडा,मोहन महादेव गावडे.जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड, उत्कृष्ट कर्मचारी :-सह दुय्यम निरीक्षकश्री. रतीश दिवाकर सुपेकर सह दुय्यम निरीक्षक, अलिबाग, प्रमोद जग्गाउप अधीक्षक भूमी अभिलेख खालापूर, अमोलजीत भटउप अधीक्षक भूमी अभिलेख महाड, भोसलेशंकर कोकणेउप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग, स्वप्नील पिंगळेशिरस्तेदार (सर्वेक्षण), उप अधीक्षक भूमी अभिलेख पनवेल, श्री. समीर पाटील शिरस्तेदार, उप अधीक्षक भूमी अभिलेख खालापूर, राहुल मुंढे परीक्षण भूमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख रोहा, संजय गायकवाडभूमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कर्जत, सुशील नावटी भूमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग, श्री. अशोक चव्हाणभूमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख महाड, योगेश देसाई भूमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख सुधागड, श्रीमती गितांजली सातवंत भूमापक (सर्व साधारण), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड.

महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारीउत्कृष्ट तहसीलदार व उपजिल्हाधिकारी महेंद्र वाकळेकर तहसीलदार श्रीवर्धन, श्रीमती स्वाती पाटील तहसीलदार तळा, चंद्रसेन रामकृष्ण पवारतहसीलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, दशरथ काळे तहसीलदारमाणगाव, पजिल्हाधिकारी रवींद्र आपदेव शेळके, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जनार्दन अंबादास कासार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. १ पनवेल, प्रकाश चंद्र संकपाळ उपविभागीय अधिकारी कर्जत, संदीपन सूर्यकांत सानपउपविभागीय अधिकारी माणगा पजिल्हाधिकारी रवींद्र आपदेव शेळके, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जनार्दन अंबादास कासार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. १ पनवेल, प्रकाश चंद्र संकपाळ उपविभागीय अधिकारी कर्जत, संदीपन सूर्यकांत सानपउपविभागीय अधिकारी माणगाव, ज्ञानेश्वर सुरेश खुटवड उपविभागीय अधिकारी रोहा.

पोलीस पाटील शेखर शरद गोटेपोलीस पाटील, गाव शिकोळे, तहसील कार्यालय सुधागड,पोलीस पाटील, विश्वनाथ गणपत वकाळेपोलीस पाटील, गाव मुंगळी, तहसील कार्यालय पेण,महसूल सेवक (कोतवाल) , प्रभाकर मधुकर पाटील महसूल सेवक, सजा वेरेव, तहसील कार्यालय अलिबाग,महसूल सेवक (कोतवाल) श्रीमती आरती प्रकाश निधी महसूल सेवक, सजा खालापूर, तहसील कार्यालय खालापूर,महसूल सेवक (कोतवाल) श्री. संजय पांडुरंग चव्हाण महसूल सेवक, सजा आसरे, तहसील कार्यालय सुधागड,महसूल सेवक (कोतवाल) श्री. अमोल धोंडू शिवाणेमहसूल सेवक, सजा देवरुख, तहसील कार्यालय म्हसळा, शिपाई संदीप गजानन भोईरशिपाई, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड,शिपाई सोंगमेश महादू भला शिपाई, उप विभागीय कार्यालय माणगाव ,शिपाई अमोल अनंत लांडे शिपाई, तहसील कार्यालय रोहा, शिपाई केशव पिकाजी कांबळे शिपाई, तहसील कार्यालय म्हसळा, वाहन चालक स्वप्नील विलास माळवी वाहन चालक, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, वाहन चालक अनिल अशोक जाधव वाहन चालक, तहसील कार्यालय रोहा,ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रीमती सानिका सुजय घरत ग्राम महसूल अधिकारी, सजा – काकडखंब, तहसील कार्यालय मुरुड, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) विशाल तुकाराम चोरेग्राम महसूल अधिकारी, सजा– गव्हाण, तहसील कार्यालय पनवेल,ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)विशाल कालिदास वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी, सजा – उसर खुर्द, तहसील कार्यालय तळा,ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रीमती विमल सुधाकर घोटवे ग्राम महसूल अधिकारी, सजा – आसरे, तहसील कार्यालय सुधागड.महसूल सहायक श्री. संदीप बाबूराव कदम सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड,महसूल सहायक श्री. गणेश काशिनाथ कोळी निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, महसूल सहायक श्री. संदीप वडीराम गायकवाड तहसील कार्यालय पेण,महसूल सहायकश्री. राजेश दत्तात्रय गाडे उपविभागीय अधिकारी कार्यालय, माणगाव, सहायक महसूल अधिकारी श्रीमती रुपाली रवींद्र पाटील सहायक महसूल अधिकारी, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, सहायक महसूल अधिकारी श्रीमती मेधा हरिश्चंद्र पाटील सहायक महसूल अधिकारी, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, सहायक महसूल अधिकारी श्री. दयानंद गजानन देसाई सहायक महसूल अधिकारी, निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड,सहायक महसूल अधिकारी श्री. सचिन प्रसाद पाटील सहायक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय अलिबाग, सहायक महसूल अधिकारी श्री. कृष्णा जनार्दन पाळवे सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय कर्जत, सहायक महसूल अधिकारी श्रीमती स्वाती सुजित शाह सहायक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय महाड, मंडळ अधिकारी श्री. अर्जुन मल्हारप्पा जमशेटी,मंडळ माणगाव, तहसील कार्यालय माणगाव, मंडळ अधिकारी अजय शंकर महाडिकमंडळ बिरवाडी, तहसील कार्यालय महाड, मंडळ अधिकारी श्री. संदीप मधुकर पाटील मंडळ आंबेवाडी, तहसील कार्यालय रोहा, मंडळ अधिकारी श्री. संतोष चंद्रकांत जांगळे मंडळ साख, तहसील कार्यालय कर्ज नायब तहसीलदारश्री. तुषार निर्मळे कामत निवडणूक नायब तहसीलदार, तहसील कार्यालय पेण, नायब तहसीलदार श्री. संदीप रामचंद्र जाधव निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय अलिबाग,नायब तहसीलदारश्री. पुंडलिक भगवान मोरल महसूल नायब तहसीलदार, तहसील कार्यालय रोहा,नायब तहसीलदारश्रीमती सविता उदय धुमाळनायब तहसीलदार (निवडणूक), निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड,नायब तहसीलदार अरविंद पोपट घेमुड महसूल नायब तहसीलदार, तहसील कार्यालय माणगाव.

०००००००

संबंधित पोस्ट

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात  केलेल्या कारवाईमुळे चर्चेत असलेले एनसीबीचे  अधिकारी समीर वानखेडे  यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये सहा महिन्यांसाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

राज्यात 633 आयटीआयच्या जागा पहिल्या फेरीत फुल्लआयटीआयची पहिली प्रवेश फेरीची अंतिम निवड यादी  जाहीर.

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे ओबीसीकरण करा संभाजी ब्रिगेडची मागणी….

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

जालना शहरात 13 फेब्रुवारीपासून भव्य महासंस्कृती महोत्सव प्रसिध्द कलावंत सादर करणार सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम