vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक– महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक– महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे

रायगड : प्रतिनिधी- भारताने जगाला दिलेले योगसाधनेचे अमूल्य ज्ञान प्रत्येकाच्या जीवनात रुजावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत माणगाव तालुका प्रशासन, तालुका क्रीडा अधिकारी व मनोयोग मंदिर, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे यांनी सहभाग घेत योगसाधना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना मंत्री कु.अदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या शरीराला व मनाला अंतर्बाह्य निर्मळ करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे ‘योग’. नियमित योगसाधना केल्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो, मनास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक बनतो. उपस्थितांनी एकत्रितपणे विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली व योगाभ्यासाचा अनुभव घेतला

यावेळी माणगाव तालुक्यातील अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

संबंधित पोस्ट

उत्तराखंड प्रशासनानं चारधाम यात्रेकरू आणि पर्यटकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून सुरक्षित प्रवास करण्याचं केलं आवाहन. 

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश,सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार