vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध

 सांगली, प्रतिनिधी: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, गायी-म्हशींच्या गोठ्यात आता अधिक प्रमाणात कालवडी जन्माला येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कृत्रिम रेतनासाठी आवश्यक असलेले “सेक्स सॉर्टेड सिमेन डोस” उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात सिमेन डोस शासकीय दराने उपलब्ध करून देण्यात येणार असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केले आहे.

 राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सांगलीची ओळख असून, नव्या तंत्रज्ञानामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या जिल्ह्यात 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध असून मागणी वाढल्यानंतर आणखी डोस उपलब्ध करून देण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

 सेक्स सॉर्टेड सिमेनमुळे गाईच्या वासराचे लिंग आधीच ठरवता येते. या तंत्रज्ञानामुळे कालवडी होण्याची शक्यता सुमारे 90 ते 95 टक्के असते. दुग्ध व्यवसायासाठी कालवड अत्यंत महत्त्वाची असल्याने हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

 दूध उत्पादक शेतकरी संकरित नर शेती कामासाठी वापरत नाहीत. त्यामुळे तो कत्तलखान्यात जातो. त्यातच गोवंश हत्याबंदी असल्याने त्यांच्या संगोपनाचा मुद्दा ऐरणीवर येतो. नर वासरांमुळे संगोपनाचा खर्च वाढतो. तो भार कमी करण्यासाठी आणि उत्पादनक्षम जनावरांची संख्या वाढवण्यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेन तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे.

 पशुधनाची विदेशी रक्त टक्केवारी सुधारण्यास मदत होत आहे. पशुपालकांचा खर्च कमी होऊन दूध उत्पादन व उत्पन्नात वाढ होते. नव्या पशुधनाची विदेशी रक्त टक्केवारी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीतून (सन 2025-26) एक कोटींचा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला असल्याने दुग्ध उत्पादक समाधान व्यक्त करत आहेत.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील सुविधा अधिक सक्षम करणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

 – ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले महाराष्ट्राचे अभिनंदन…

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय