vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

राज्य प्रतिनिधी-गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुकांनी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह आरटीओ कार्यालयात सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता लिलाव आयोजित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज १६ मार्च २०२६ रोजी स्वीकारले जाणार असून त्याचा लिलाव १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता सहकार सभागृहात करण्यात येणार आहे.

लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकच सीलबंद डीडी स्वीकारला जाईल.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८१ च्या नियम ५४अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक १८० दिवसांपर्यंत वैध राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांकांसाठी प्रक्रिया https://fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी आधार संलग्नित मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पसंती क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी क्षमता वृद्धी महत्त्वाची’क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचे मत..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…