vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

 

मुंबई प्रतिनिधी-

टोरेस ज्वेलरी कंपनीवर हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे. कंपनीचे मीरा-भाईंदरचे आऊटलेट सोमवारी अचानक बंद झाल्याने दुकानाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी झाली. दादर येथील दुकानाबाहेर प्रचंड गर्दी पोलिसांनी शोरूम ताब्यात घेतला पोलिसांचा बंदोबस्त आरोपींवर शिवाजी पार्क पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

 सविस्तर माहिती अशी ही-2023 मध्ये नोंदणीकृत ‘प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने 2024 मध्ये ‘टोरेस’ ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले. कंपनीने सोने, चांदी आणि हिरे खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520% ​​वार्षिक परतावा देण्याचे वचन दिले. रिटर्न साप्ताहिक भरले जात होते. दोन आठवडे परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच असे

**शिवाजी पार्क पोलीस ठाणे, गुन्हा दाखल केल्याची माहिती..*  ➡️ *गुन्हा रजिस्टर नंबर* – 06/2025 कलम 318(4), 316 (5), 61, बी.एन.एस सह एम.पी.आय.डी.ॲक्ट कलम 3, 4 अन्वये.➡️ *फिर्यादी यांचे नाव व पत्ता* प्रदीपकुमार मामराज वैश्य, वय 31 वर्ष, व्यवसाय – भाजी विक्री, ➡️ *गुन्हा घडला दिनांक* – 21/06/2024 रोजी ते 30/12/2024 पावेतो.➡️ *गुन्हा दाखल दिनांक* –

06/01/2025 रोजी 17.07 वा.➡️ *घटनास्थळ*- टोरेस वास्तु सेंटर बिल्डिंग, जे के सावंत मार्ग,दादर पश्चिम,मुंबई.➡️ **आरोपी* – 1) सर्वेश अशोक सुर्वे, 2) व्हिक्टोरिया कोवलेंको 3) तोफिक रियाज कार्टर, 4) तानिया कसतोवा, 5) व्हॅलेंटीना कुमार ➡️ *फसवणूक केलेली मालमत्ता* 13,48,15,092 रू.रोख रक्कम ➡️ **हकीकत-*-

थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 21 जुन 2024 रोजीपासुन ते 30/12/2024 या कालावधीदरम्यान प्लॅटिनम हर्न प्रा.लि. ही कंपनी व सदर कंपनीचे संचालक 1) सर्वेश अशोक सुर्वे 2) व्हिक्टोरिया कोवालेन्को, 3) सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कारटर तसेच सदर कंपनीच्या जनरल मॅनेजर 4) तानिया कॅसातोवा व कंपनीची स्टोअर इंजार्च 5) व्हॅलेंटीना कुमार यांनी त्यांचेकडील मोजोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवलेल्या रक्कमेवर आठवड्याला 6 टक्के प्रमाणे परतावा देण्याचे आमिष, प्रलोभन दाखवले व गुंतवणुक करण्यास भाग पाडले, सदर आमिशाला फिर्यादी व त्यांचे माहितीमधील वर नमुद गुंतवणुकदारांची एकुण 13,48,15,092/-रूपये रक्कम ठेव म्हणुन स्विकारली. स्विकारलेल्या रक्कमेवर सुरूवातीला काही काळ अल्पशा रकमेचा परतावा देवुन 30/12/2024 नंतर कोणताही आश्वासित रक्कमेचा परतावा व मुद्दल रक्कम परत न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली. फिर्यादी यांची विश्वासपुर्वक ठेव म्हणुन सोपविलेल्या नमुद रक्कमेचा कपटपुर्वक अपहार केला म्हणुन त्यांनी टोरेस ब्रेड चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. ही कंपनी, तसेच कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे व इतर यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला आहे..

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली – उपमुख्यमंत्री

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा-राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड५ प्रधान सचिवांसह ७ सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व..

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सावळी येथे 29 जुलैला व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम कार्यशाळा