vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे प्रतिनिधी- ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटरला चालना देऊन, औषधनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन एपीआय उद्योगाला आवश्यक त्या सुविधांना प्राधान्य देण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेच्या पुढाकाराने ठाणे क्षेत्र विकासासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. यावेळी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

‘मित्रा’च्या माध्यमातून ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेतील विविध मुद्यांचा आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. ठाणे, नवी मुंबई परिसरात आयटी व डेटा सेंटर वाढविण्यासाठी चालना देणे त्यासाठी एमआयडीसीमध्ये विशेष भुखंड निश्चित करून समर्पित डेटा सेंटर पार्क विकसीत करणे याविषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. उद्योग विभागाने यासंदर्भात डेटा सेंटर पार्कसाठी अधिसूचना काढण्याच्या कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

औषधनिर्मिती लागणारे एपीआय (ॲक्टिव्ह फार्मसिटीकल मॉलिक्युल) उद्योग ठाणे भागात मोठ्या प्रमाणावर असल्याने या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ड वर्ग उद्योगांसाठी लागू असलेल्या सवलती एपीआय उद्योगांना लागू कराव्यात, एमआडीसीने भुखंड द्यावेत आदी विषयांवर चर्चा झाली. एमएमआर क्षेत्रात ३० लाख नवीन घरांची निर्मिती यासंदर्भातही याबैठकीत चर्चा झाली.

 

संबंधित पोस्ट

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश* दहावी, बारावी परीक्षेच्या तयारीचा घेतला आढावा* बुलढाण्यात बारावीच्या ३४,६३५ विद्यार्थ्यांची परीक्षा ; ११६ परीक्षा केंद्र…

vishwatmaklokswamivarta

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळा शिक्षकांना एकस्तर पदोन्नती योजना सुरू,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश..

मराठी पत्रकारितेचे जनक : आचार्य बाळशास्त्री जांभेकर

विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत मान्यता मिळालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता

vishwatmaklokswamivarta