vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, प्रतिनिधी – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक सोबत संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण ही पदे शिक्षक संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्रालयात याविषयी झालेल्या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील इतर विद्यापीठामध्ये ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण यांना शिक्षक संवर्गात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी अशाच नियमानुसार कार्यवाही व्हावी. यासाठी केंद्रीय वैद्यकीय परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

vishwatmaklokswamivarta

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा भरपाई आराखडे त्वरीत सादर करा-पालकमंत्री शंभूराज देसाई

सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन