vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, दि.१५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत वाहतूक नियमावलीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गावरील *झालटा फाटा ते एस.आर.पी.एफ. (SRPF) कॅम्प* आणि पुन्हा त्याच मार्गे झालटा फाटा पर्यंत (१० कि.मी.) सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज पहाटे ५.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत. झालटा फाटा ते SRPF कॅम्प दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी किंवा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने,बीडकडून छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळेकडे जाणारी वाहतूक ही हॉटेल पालखी जवळून धुळे येथून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून ये-जा करण्यासाठी उपलब्ध असेल.

सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांच्या सायकली आणि वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ,नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता वाहनधारकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डॉ. विनयकुमार राठोड ,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…