vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

 पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

  रायगड( प्रतिनिधी:- राज्यातील पर्यटन उद्योगाच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक 30.04.२०२५ पासून अंमलात आलेल्या शासन निर्णयानुसार, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील खाजगी आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या पर्यटन विषयक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रतिमानिर्मिती आणि ब्रँडिंगसाठी खास धोरणे अंमलात आणली जात आहेत.

या योजनेअंतर्गत स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांना अनुदान व सहकार्य दिले जाणार आहे. यात खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था व अन्य आयोजक समाविष्ट आहेत. पर्यटन व सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, खाद्य महोत्सव, क्राफ्ट व हँडीक्राफ्ट प्रदर्शन, MICE इव्हेंट्स (मीटिंग, प्रेझेंटेशन, एक्झिबिशन), डिजिटल मोहिमा, मीडिया टूर, फॅम टूर, इत्यादी उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महत्त्वपूर्ण बाबी व उपक्रम-पर्यटन क्षेत्रातील ब्रँडिंग: महाराष्ट्र पर्यटन विभाग वार्षिक पर्यटन विपणन आणि ब्रँडिंग योजना तयार करणार असून, त्याअंतर्गत प्रचार उपक्रम राबवले जातील.प्रचार साहित्य निर्मिती: OTT प्लॅटफॉर्म, डिजिटल मीडिया, दूरचित्रवाणी, रेडिओ, फील्ड इव्हेंट्स व लोकशाहीरांच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटनाचा प्रचार केला जाईल. Social Media Influencer चा वापर: १ लाख फॉलोअर्स असलेल्या प्रभावी इन्फ्लुएंसर्सकडून महाराष्ट्र पर्यटनाशी संबंधित साहित्य तयार करून त्याद्वारे प्रभावी जनजागृती केली जाणार आहे.

उच्चस्तरीय समितीची स्थापना,पर्यटन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, गृह व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून असतील. ही समिती पात्र प्रस्तावांना मान्यता देणार आहे.प्रस्ताव सादर करण्यासाठी नियमावलीपात्र संस्था ही नोंदणीकृत संस्था असावी. प्रस्ताव सादर करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करणे आवश्यक आहे.प्रस्तावात कार्यक्रमाचा तपशील, उद्दिष्ट, खर्चाचा तपशील, प्रचार माध्यमे, अपेक्षित लाभ इत्यादींचा समावेश असावा.

मंजूर प्रस्तावासाठी निश्चित वेळेत ‘Statement of Expenditure’ सादर करणे बंधनकारक आहे.इतर अटी व शर्ती – पर्यटन विभागाच्या लोगोचा वापर पर्यटन विभागाच्या संमतीने करावा लागेल. नियोजित कार्यक्रम पर्यटन विभागाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असावा. मान्यताप्राप्त मीडिया संस्थांकडून प्रसिद्धी करण्यात यावी. कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे.

  अधिक व तपशिलवार माहितीसाठी शासन निर्णय क्र. महोत्सव-2018/12/प्र.क्र.1126/पर्यटन-3 दि. 30 एप्रिल 2025 पाहावा. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 202504301806054523 असा आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील विविध संस्थांना पर्यटनविषयक कार्यक्रम आयोजनासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मार्गदर्शन मिळणार असून, पर्यटन क्षेत्राचा विस्तार व प्रचार करण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड*

vishwatmaklokswamivarta

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta