vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

गडचिरोली, द प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश ग्रामीण व दूरदूरच्या भागांतील नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे आणि केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हा आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आज बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व बँकांना ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे तसेच नागरिकांनी या मोहिमेमार्फत उपलब्ध होणाऱ्या सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विशेषतः विमा व पेन्शनसारख्या सामाजिक सुरक्षेच्या योजनांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.या मोहिमेअंतर्गत शून्य शिल्लक रकमेवर जनधन खाती उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच अटल पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी करणे, जुनी व निष्क्रिय बचत खाती पुन्हा सुरु करण्यासाठी रि-केवायसी करणे, डिजिटल फसवणुकीपासून बचाव आणि रिझर्व बँकेच्या दावा न केलेल्या ठेवींवर दावा करण्याची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले, तसेच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशांत ढोंगले यांनी या मोहिमेचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, प्रत्येक बँकेला विशिष्ट गाव नेमून देण्यात आले असून, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामसेवक, तलाठी व ग्राहक सेवा केंद्रांचे सहकार्य घेतले जाईल. नागरिकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या बँक शाखेशी किंवा जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी – आमदार विलास तरे# कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देऊन जोरदार मागणी

vishwatmaklokswamivarta

1 एप्रिलपासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टीच्या २१ शाखांचे एकाच दिवशी भव्य उदघाटन

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta